गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत आणि निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेल्या गडब ग्रुप ग्रामपंचायतीच्या नाल्यात घाणीचे ढीगारे साठले असून यामुळे लोकांना तोंडावर रुमाल ठेवून चालावे लागत आहे . तसेच या नत्यातील घाणीमुळे संबंधीत लोकांना दमा खोकल्या सारखे आजार संभवत आहेत . गावात विविध प्रकारे घाणीच्या साम्राज्यामुळे मच्छरांचे थवेच्या थवे घरामध्ये आढळून येतात . मागे एकदा फवारणीची कामे उरकण्यात आली होती . मात्र मच्छरांचे साम्राज्य कमी होत नाही .
संर्दभात ग्रुप ग्राम पंचायतीने जेएसडब्ल्यू कंपनीकडे प्रस्ताव पाठवीला होता . त्या नुसार गडब ग्रुप ग्रामपंचायतीला घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती मात्र सदर घंटागाड्या नादुरुस्त होऊन कचऱ्यात टाकण्यात आल्या आहेत.त्यामुळे कचरा उचलण्यासाठी कचरापेटींचा वापर करण्यात आला आहे.मात्र सदर लोक कचराकुंडीत वापर कचरा टाकण्यासाठी कमी नाल्याचा वापर कचराकुंडीसाठी करण्यात आला आहे.त्यामुळे गावातील लोकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते.
त्यामुळे गडब ग्रुप ग्रामपंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस पावले उचलावी अशी सर्व सामान्य लोकांची मागणी आहे.