Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

⭕उन्हाच्या तडाख्याने १५ श्रीसदस्यांचा मृत्यू ; सगळीकडे हाहाकार ...⭕

Responsive Ad Here
 गडब/सुरेश म्हात्रे

   खारघर येथील पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित असलेल्या काही जणांना उन्हाचा त्रास जाणवू लागल्याने १५ जण दगावल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली दरम्यान मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे .
    कार्यक्रम स्थळी सुमारे 300 जणांना याचा त्रास जाणू लागला होता कार्यक्रम स्थळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले मात्र जे अत्यवस्थ होते त्यांना अधिक उपचारासाठी कामोठे येथे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले या सर्वांची विचारपूस करण्यासाठी शिंदे हे रात्री उशिरा रुग्णालयात आले होते .
    त्यांनीच याबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली त्यांनी या सर्वांवर योग्य ते उपचार करण्याचा करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या जे मृत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख देण्याची घोषणा ही त्यांनी केली . तसेच केंद्राकडू न २ लाख उपयांची मदतही देण्यात आली याबाबत राज ठाकरे यांनी सदर कार्यक्रम संध्याकाळी घ्यायला हवा होता असे नमुद केले .