गडब/सुरेश म्हात्रे
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.अनेक ठिकाणी समिजिक,सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपात हा सण साजरा करण्यात आला.
पेण शहरामध्ये आंबेडकर चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचा विनम्र अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली होती.पेण येथील वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी व संघटनांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आपापली हजेरी लावण्यात आली होती.
नगरपालिकेकडून मुख्याधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक जिवन पाटील यांनी डॉ.बाबासाहेबांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.महविकास आघडीच्या सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांनी देखील पुष्पहार अर्पण केले.यामध्ये जगदीश ठाकूर,प्रकाश शिगृत,दयानंद भगत,प्रवीण पाटील, दिपश्री पोटफोडे,मिहिर धारकर,प्रीतम पाटील,वैशाली कडू उपस्थित होते.
सायंकाळी पेण शहरात ढोलताशांच्या गजरात डॉ. बाबसाहेबांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये देखील डॉ.बाबासाहेबांच्या अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.