Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण तालुक्यात शिंदे, ठाकरे गटात हाणामारी

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे

पेण तालुक्यातील शिंदे गट आणि ठाकरे गटात आता रस्त्यावरच हाणामारीचे प्रकार सुरु झालेले आहेत. रोडेचे उपसरपंच नरेश सोनावणे यांना मारहाण करण्याची घटना घडल्याने वातावरण तंग बनले.
पेण पंचायत समिती कार्यालयामध्ये सुरू असणाऱ्या प्रशिक्षण शिबिरामधून बोलवून रोडे गावचे उपसरपंच नरेश नथुराम सोनावणे याला लाथाबुक्याने मारून त्याला जातीवाचक शिव्या दिल्याचा प्रकार घडला आहे. नरेश सोनावणे हे ठाकरे गट सेनेचे रोडे गावचे उपसरपंच आहेत. तर राहुल पाटील हे शिंदे गट सेनेचे विधान सभा संघटक आहेत.
नरेश नथुराम सोनावणे हे पेण पंचायत समिती कार्यालयात प्रशिक्षण शिबिरामध्ये हजर होते. त्यावेळी राहुल पाटील यांनी त्याला फोन लावून त्याला विचारण केली की तु कुठे आहेस, मला भेटाच आहे आणि ४ च्या सुमारास राहुल पाटील आपल्या इतर चार सहकार्यासोबत
रोडेच्या उपसरपंचाला मारहाण
पेण पंचायत समिती येथे पोहोचला आणि त्यानी नरेश सोनावणे याला प्रशिक्षणातून बाहेर बोलावून घेत अरुण पाटील यांच्या सेवा निवृत्तीच्या विषयाला सुचक म्हणून तुझे नाव का टाकलेस आणि नंतर त्यानी त्याला मारहाण सुरू केली. त्याला लाथाबुक्याने मारले. तर गोरख पाटील यांनी नरेश याला जातीवाचक शिवीगाळ करून आमच्या माणसाला कामावरून काढण्याची आणि पुन्हा त्याला मारहाण करत त्याला पुन्हा पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारा पर्यंत आणले. त्यानंतर नरेश यांनी पेण पोलीस ठाणे गाठून तक्रार पोलीसांपुढे मांडली.
या संदर्भात पेण पोलीस ठाण्यात भा.द.वि. क. १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६, सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (आर) (एस) ३ (२) (व्हीए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.