Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

काराव ( गडब ) ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांनी स्वीकारला पदभार;ग्रामस्यांनी केले स्वागत

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

 पेण तालुक्यातील काराव( गडब ) ग्रामपंचायतीच्या नुतन सरपंच सौ. मानसी मंगेश पाटील व उपसरपंच
 श्री.मनोज काशिनाथ म्हात्रे यांच्या सहित सर्व सदस्यांनी कार्यभार स्वीकारला असून ' गावच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे गडब गावच्या प्रथम नागरिक असणाऱ्या सरपंच सौ. मानसी मंगेश पाटील यांनी सांगीतले . सर्व नवनिर्वाचीत सदस्य निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी भरून काढण्यासाठी सरपंच उपसरपंच व सदस्य कामला लागले आहेत . यामध्ये सौ मानसी मंगेश पाटील सरपंच, मनोज काशिनाथ म्हात्रे - उपसरपंच, तसेच सदस्य मनोहर पाटील, गीता पाटील,दिपक कोठेकर, जगदिश कोठेकर, परशुराम मोकल, दिनेश म्हात्रे किर्ती म्हात्रे, संध्या म्हात्रे, वैशाली म्हात्रे, मुक्ता वाघमारे, दिपाली भोईर या सर्व सदस्यांची कमिटी गडब ग्रामपंचायती मध्ये विराजमान झाली . यावेळी सरपंच, उपसरपंच, आणि सदस्य, भगवे फेटे परिधान करून प्रवेश केला . यावेळी ग्रामस्यांनी फुल वर्षाव करित त्यांचे स्वागत केले .ग्रामस्थांच्या सत्काराला उत्तर देताना गडबच्या सरपंच सौ मानसी मंगेश पाटील यांनी सांगीतले की, गडबच्या विकासाच्या गोष्टी खूप होतील मात्र गडबचा सर्वांगीन विकास कख्यासाठी आम्हाला जनतेने निवडून दिले आहे . त्याचे सोने करून गडब चा सर्वागीन विकास करण्याचा प्रयत्न करू . ग्रामस्यांनी या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत . त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेतून गरिबांना मिळणाऱ्या घराच्या प्रश्न, शुद्ध पिण्याचा पाण्याचा प्रश्न, परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न ग्राम पंचायती अतर्गत असणारे रस्ते व नाल्याचा प्रश्न अशा अनेक प्रश्न सोडवण्याचा मनोगत व्यक्त केले यावेळी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या हस्ते सरपंच सौ मानसी पाटील व उपसरपंच श्री मनोज म्हात्रे व सदस्यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर स्वातंत्र्य सेनानी गोवर्धन पाटील हे होते . यावेळी डोलवी गावचे सरपंच श्री परशुराम शेठ म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी सरपंच मानसी पाटील व उपसरपंच मनोज म्हात्रे यांचा सत्कार केला . यावेळी के पी . पाटील, सिताराम लांगी, संजय चवरकर ग्रामसेविका धनावडे, यशवंत म्हात्रे आदी उपस्थित होते . तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन यशवंत म्हात्रे यांनी केले.