Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

महाविकास आघाडीने फोडला सरकारचा 'भ्रमाचा भोपळा'

Responsive Ad Here

  
गडब/सुरेश म्हात्रे

राज्याच्या शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प बुधवारी (ता. ०९) रोजी सादर झाला. या अर्थसंकल्पात शाश्वत शेती, शेतकऱ्यांसाठी सरकारने •मोठ्या घोषणा केल्या गेल्या आहेत. दरम्यान आजपासून सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीकेला सुरूवात केली आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायन्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी हातात भोपळे आणि कोहळे घेऊन आंदोलन केले आहे. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला होता.
कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने सध्या राज्यातील कांदा आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यामुळे कांद्याला अनुदान देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, त्याबाबत अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याचप्रमाणे अवकाळी पावसाचा मोठा फटका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही सरकारने तत्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी देखील विरोधकांनी केली आहे.
बसलेल्या
त्यावरही सरकारनं अद्याप निर्णय घेतला आहे. त्यामुळं या दोन्ही मुद्दयावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले. या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या आमदारांनी बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा असल्याच्या घोषणा देत डोक्यावर भोपळे घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर या अर्थसंकल्पाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी हातात भोपळे दाखवून
राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. यावेळी 'बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा सह इतर घोषणा, निदर्शने करून विरोधकांनी सर्वांचे लक्ष वेधले. महाराष्ट्राला मिळाला भोपळा, कांदा उत्पादकांना मिळाला भोपळा, कापूस उत्पादकाला मिळाला भोपळा, शेतकऱ्यांना मिळाला भोपळा, अशा घोषणाही यावेळी विरोधकांनी केल्या. 'सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके असे फलक देखील यावेळी झळकवण्यात आले.