गडब/सुरेश म्हात्रे
तालुक्यातील शहापुर,धेरंड परिसरात समुद्राच्या भरतीचे पाणी वारंवार घुसत असल्याने ग्रामस्थ हैराण आहेत. संकटासोबतच शेतीचेही नुकसान होत आहे. पत्रकार याबाबत बातम्या देवून थकले पण प्रशासनाला जाग येत नाही. परंतू पत्रकारच न्याय मिळवून देतील या आशेवर, राजन भगत या शेतकर्यांने बातमी छापण्यासाठी थेट ‘जिताड्याचीच शपथ’ पत्रकारांना घातली आहे.
शहापूर, धेरंड परिसरात जिताडा मासा पाळलेे जातात. या माशाला मोठी मागणी असते. मात्र समुद्राचा पाणी वारंवार तलावांमध्ये घुसत असल्यामुळे मासे वाहून जातात परिणामी शेतकर्यांचे नुकसान होते. परवा 20 फेब्रुवारी पासून उधाणांचे पाणी शहापूर व धेरंड गावाच्या पूर्वेस घरामध्ये रात्रीच्या वेळेस शिरून खूप नुकसान झाले आहे.