Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो: उद्भव ठाकरे

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे 

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाविरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आज त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. कारमध्ये उभे राहून साधलेल्या या संवादात त्यांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिले आहे. मर्द असाल तर चोरलेला धनुष्यबाण निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरा. मी मशाल घेऊन येतो. कोण जिंकतो ते बघुया, असे खुले आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.
मातोश्रीबाहेर ठाकरे गटाचे जोरदार शक्तिप्रदर्शन
_मातोश्रीबाहेर ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन_ केलं. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. ज्या पद्धतीने आपले
शिवसेना हे नाव चोराला दिले. आपला पवित्र धनुष्यबाण हा चोराला दिला. ज्यांनी धनुष्यबाण चोरला ते मर्द असतील तर त्यांनी चोरलेला धनुष्यबाण घेऊन निवडणुकीत यावं. मी मशाल घेऊन तुमच्यासमोर उभा राहतो. बघुया काय होतं तर.
धनुष्यबाण पेलायलाही मर्द लागतो. रावणाने शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो उताणा पडला होता. तसेच हे चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
*माझी ताकद तुम्ही आहात !*
*मी कुठेही खचलो नाही. कुठेही खचणार नाही. माझी ताकद तुम्ही आहात. तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. ही ताकद जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत असे कितीजरी चोर आणि चोरबाजाराचे मालक आले तरी त्यांना गाडून त्यांच्या छातीवर शिवरायांचा भगवा फडकवण्याची ताकद आमच्या मनगटात आहे, असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.*