Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

डोलवी येथे एल डी म्हात्रे यांच्या कविता संग्रहाचे प्रकाशन व हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार

Responsive Ad Here
 गडब/सुरेश म्हात्रे

ह.भ.प. रायगड भूषण प्रा. एल. डी. म्हात्रे सर डोलवी यांच्या अनुभव या कविता संग्रहाचे मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले. तसेच २०० वर्षापूर्वीच्या हनुमान मंदिराचा जीर्णोधार सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात पार पडला.   यावेळी रायगड भूषण संतोष  पाटील तरणखोप  व रायगड भूषण आस्विनी पाटील यांनी सादर केलेल्या संगीत संध्या  कार्यक्रमाने  बहार आणली. तसेच ह.भ. प. गणेश महाराज भगत यांचे कीर्तन संपन्न झाले. सदर प्रसंगी दोनही दिवस डोलवी गाव भक्तीमय वातावरणात रंगुन गेले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून डोलवी येथील सुप्रसीद्ध कीर्तनकार, प्रवचनकार  व क्रीडा समालोचक  ह.भ.प. रायगड भूषण, कोकणभूषण व इतर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले एल.डी. म्हात्रे सर यांच्या अनुभव या कविता संग्रहाचे प्रकाशन ह.भ.प. गोपिनाथ महाराज जाधव आणि ह.भ.प. गणेश महाराज मनमंदिर फेम, कीर्तन केसरी पुणे यांच्याहस्ते तसेच शेकडो वारकरी भाविक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.
सदर प्रसंगी ह.भ.प. एल.डी. म्हात्रे सर यांचा शाल, श्रीफल, पुष्पहार देऊन देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला 
सदर प्रसंगी १०० काव्य प्रतीचे वाटप करण्यात आले. सदर पुस्तिकेत अनेक व्यक्तींचा वेध घेणाऱ्या कवितांचा समावेश आहे.