Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

जे एस डब्ल्यूच्या बांधबंदिस्तीचे प्रकरण अंगलट आल्याने खाजगी एजंटना मध्यस्ती

Responsive Ad Here


गडब/ सुरेश म्हात्रे 


पेण तालुक्यातील पोलाद उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या जे एस डब्ल्यू कंपनीने परवानगी न घेता खारमाचेला गडब विभागात बांध बांधून मच्छीमार व शेतकऱ्यांना अडथळा निर्माण केला होता . कंपनीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेत नव्हते तद्नंतर खारमाचेला विभागातील बापदेव शेतकरी संघटनेच्या पदाधीकाऱ्यांनी सामुहीक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता त्या अनुशंघाने सदर शेतकर्‍यांनी आत्मदहन करण्याचा पवित्रा घेतला होता 

      मात्र खारलॅन्ड विभागाचे शेतकरी सु ह . सावंत यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सहर आत्मदन आंदोलनाला स्थगीती देण्यात आली होती व सदर पाईप काढण्याचे निश्चित करण्यात आले होते . या सर्व घडामोडीत जे एसडब्ल्यूचे मात्र पितळ उघडे पडले वडखळ पोलिसांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या व जे एसडब्ल्यू कंपनीच्या मर्जीनुसार वागणाऱ्या वडखळ पोलिसांना चपराक बसली आहे. आतातर कहर झाला आहे . जे एसडब्लूने आपल्या खाजगी एजंट मार्फत वृत्तपणात व युट्युब चॅनलवर खोट्या बातम्या पसरवण्यास सुरुवात केली आहे . सदर चॅनलवर व वृत्तपत्रात जे खारमाचेला व जुईबापुजी हद्दीतील शेतकरी नाहीत अशांना कंपनीने हाताशी धरून खोट्या बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी मदत केली . अशा या अति चाणाक्ष जे.एसडब्ल्यू कंपनी विरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे .