गडब/सुरेश म्हात्रे
कोकणचा तिठा म्हणून प्रसिध्द आहे असलेले वडखळ येथील इस्पात, जॉन्सन आहेत. आदी महाकाय कंपन्यांनी जमिनी गिळकृत करुन पाण्यावरही आडवा हात मारल्याने मच्छीमार आणि शेतकरी उध्वस्त होत आहेत. धगधगणाऱ्या यंत्रामधून उडणारा लोखंडी कीस आणि चुन्याची भुकटी हवेत मिसळत असल्याने कासू आणि वडखळ विभागातील नागरिकांना विविध गंभीर आजार होऊ लागले आहेत.
पेण तालुक्यातील डोलवी येथे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जे.एस.डब्ल्यू कंपनीने गडब,डोलवी, खारकारावी, नवेगाव, वावे, वडखळ, कोळवे, बेणेघाट शिंगणवट बोर्वे व जुईबापूजी या परिसरातील शेतकऱ्यांवर विविध आश्वासनांची खैरात करीत एक एकर जमिनीमागे बावन्नलाख रुपये तसेच स्थानिक भुमिपुत्रांना कंपनीत नोकरी देणार होते. परिसरात कारखाना येतो आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील बेरोजगांराना काम मिळेल या आनंदात येथील शेतकरी होते. परंतु प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कंपनीने प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली.
जूई बापूजी येथील बाहेर काठयाची दुरुस्ती शेतकऱ्यांच्या इतिहास पूर्व जाण्यायेण्याचे मार्ग मोकळे करणे, अंर्तबाह्य सर्वे करुन बांध पूर्ववत करणे, बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे या मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी तात्कालीन काँग्रेस जिल्हा अध्यक्ष म तात्कालीन आरोग्य सभापती सुरेश शेठ म्हात्रे, डोलवी सरपंच व काराव गडबचे सरपंच व इतरांना मध्यस्ती करुन तोडगा काढण्याचे ठरविले होते .परंतू अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. व्यवस्थापन वेळकाढूपणाचे धोरण आवलंबत आहे व शेतकऱ्यांची दिशाभूल करु पहात आहेत.
कंपनीने शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त असल्याचे सर्टिफिकीट दिले आहे. परंतू कंपनीतर्फे प्रशिक्षण देऊन योग्यतेनुसार कंपनीत नोकरी दिली जाईल असेही अश्वासन देण्यात आले होते. परंतू आजपर्यत कोणालाही प्रशिक्षण अथवा नोकरीत समावष्टि केलेले नाही. कंपनीमधून आज मोठया प्रमाणात प्रदुषण होत आहे. मोठमोठे आवाज निर्माण केले जात आहेत. येथील खारमाचेला( गडब) येथील शेती निकृष्ठ निर्माण केल्या आहेत. शेतकर्यांचे जाण्या-येण्याचे मार्ग बंद केले आहेत. तसेच खारेपाणी शेतामध्ये घुसून शेती नापीक बनवली आहे. कंपनीच्या बार्जेस मालवाहू जहाजांच्या वर्दळीने या परिसरातील खाडी व समुद्रलगच्या भागात जणू थैमान घातल्यासारखे झाले आहे. मच्छिमारांचे जाळी तोडणे, मांडे मोडणे, होड्यांना धडक देणे असे प्रकार होत असतात. त्यात तीन मच्छिमारांच्या मृत्यूचीही नोंद आहे. बार्जेसच्या येण्याजाण्यामुळे प्रचंड लाटा उठताता. किनारपट्टीवर जोरदार आदळल्याने शेतीच्या बाहेरकाठयाची धुप होऊन खांडी जाण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. प्रदुषित धुर, लोखंडी किस, चुन्याची भुकटी, धुळीचे कण हवेत पसरल्याने हा परिसर लालेलाल झालेला दिसत आहे. प्रदुषणामुळे येथील लोकांना विविध आजारांची लागण लागली आहे. उदा, खोकला, दमा यांसारखे आजार सभवत . या कंपनीत नोकरी कराराची म्हणजे ९ ते१० वर्षे आयुष्यातून कपात करणे यासारखे आहे.लोकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.
कंपनीच्या विरोधात अनेकदा मोर्चे, उपोषणे करण्यात आली त्यावेळी मध्यस्थीसाठी राजकीय तसेच सामाजित नेते पुढे सरसावले व त्यांनी आपली पोळी भाजून घेतली असे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कंपनीत स्थानिकांना डावळून बिहार, युपी, मध्यप्रदेश या राज्यातून आलेल्या कामगारांना प्राधान्य दिले जात आहे. कंपनीच्या चालढकळपणामुळे प्रकल्पग्रस्ताची परवड सुरु आहे.