✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
पेण तालुक्यातील डोलेवी येथे पाणी पिण्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर लाकडी पट्टीने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना २४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १ वाजता घडल्याची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिस नोंदीनुसार, डोलेवी येथे एलएनपी कंपनीमध्ये डंपर चालक म्हणून काम करणारे धर्मेंद्र कुमार (वय २८) हे पाण्याची बाटली भरून ठेवत होते. त्यावेळी आरोपींनी पाणी मागितले. पाणी देण्यास नकार दिल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी धर्मेंद्र कुमार यांच्याशी वाद घालत त्यांची मान पकडल्याचे तसेच झटापट केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, आरोपींनी धर्मेंद्र कुमार यांना पकडून ठेवले असता अन्य आरोपीने तुटलेल्या दरवाज्याची लाकडी पट्टी उचलून त्यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात धर्मेंद्र
कुमार गंभीर जखमी झाल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोंदीनुसार आरोपींमध्ये गोलु कुमार महतो, रंजन कुमार ठाकूर यांचा समावेश असून जखमी व्यक्तीचे नाव ठाकूर रोहन साव असे नमूद आहे. सदर आरोपी वडखळ वरून पेण येथे गेला आणि पेण वरून ट्रेनने मुंबई टिळकनगर येथून वडखळ पोलीसांनी आरोपीस अटक केले
घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नालकुल व वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या . मार्गदर्शना खाली Api जाधव पो ह रुपेश कोंडे पोह . देसाई यांनी केलेल्या प्रयत्नातून आरोपीस पकडण्यात यश आले आहे .