Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

✨✨✨♦️ ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्द येथे पावसाळी क्रीडा स्पर्धांचे उत्साहात संपन्न ; विद्यार्थ्यांनी दाखविले उत्कृष्ट क्रीडा कौशल्य; विजेत्यांचा गौरव

Responsive Ad Here
    ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे


    ग्रुप ग्रामपंचायत चरई खुर्द अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बेलघर, खैराट, चरई खुर्द, गौळवाडी तसेच गौळवाडी आदिवासीवाडी येथील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.
 ...विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, शारीरिक तंदुरुस्ती वाढावी तसेच स्पर्धात्मक वृत्ती आणि सांघिक भावना विकसित व्हावी, या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

🏅 विविध स्पर्धांतील विजेते

🥇 धावणे
दक्ष दीपक साळुंखे, अंजली मोतीराम कोळी

🍋 चमचा-लिंबू स्पर्धा
मल्हार महेश साळुंखे, चैतन्या वसंत भोईर

🪣 बकेट बॉल
दक्ष साळुंखे – सोनाक्षी हिलम

👬 तीन पायांची शर्यत – मुले
मल्हार साळुंखे – दक्ष साळुंखे

👭 तीन पायांची शर्यत – मुली
पूनम पवार – सोनम हिलम

🪢 रस्सीखेच
🏆 रा. जि. प. शाळा चरई व गौळवाडी आदिवासीवाडी

या स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी दानशूर व्यक्तिमत्त्व श्री. मोहन नारायण जाधव साहेब व श्री. राजेश विठोबा गायकर साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल आयोजकांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमास सरपंच श्री. प्रविण चंद्रकांत आंबार्ले, उपसरपंच श्री. अजय अनंत सावंत, सदस्य श्री. दिनेश गोविंद भोईर, सदस्या सौ. रश्मी राजेंद्र आंबार्ले, माजी उपसरपंच श्री. लक्ष्मण गोपाळ भोईर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, क्रीडा मार्गदर्शक, स्वयंसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वांच्या सहकार्यामुळे पावसाळी क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाल्या. विजेत्या विद्यार्थ्यांसह स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.