गडब / अवंतिका म्हात्रे
पेण तालुक्यातील वरप येथे वडखळ पोलिसांनी कारवाई करत 78 वर्षीय व्यक्तीकडून 245 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत 12 हजार 250 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी लक्ष्मण महादू मनये (वय 78, रा. वरप, ता. पेण, जि. रायगड) यांच्याविरुद्ध वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 105/2026 नुसार गुंगीकारक औषध द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 (NDPS Act) अंतर्गत कलम 8(क), 20(ब)(II)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, 11 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 1.05 वाजता मौजे वरप येथे आरोपीच्या राहत्या घराच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी काळपट व हिरवट रंगाची पाने, फुले व फळे असलेला तसेच उग्र वास येणारा वनस्पतीजन्य पदार्थ आढळून आला. तपासणीअंती तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले असून, एकूण 245 ग्रॅम वजनाचा गांजा, किंमत 12,250 रुपये, पोलिसांनी जप्त केला.
सदर गांजा विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात बाळगल्याचा आरोप संबंधित व्यक्तीवर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी Pi संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली api जाधव यांच्या पथकाने asi कांबळे, HC ढेने, HC कोंडे,HC देसाई, HC गायकवाड, HC घासे, PC ठाकूर पुढील तपास करीत आहेत.
♦️♦️वडखळ पोलिसांची कौतुकास्पद कारवाई
अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असून, या प्रकरणातील पुढील तपासादरम्यान गांजा कोठून आणण्यात आला आणि त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.