Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️नागोठणे आणि वडखळ पोलीसांनी संयुक्त मोहीम राबवत बेकायदेशीर गावठी हातभटटी दारू अड्डाउध्वस्त ♦️♦️

Responsive Ad Here
✍🏻गडब /अवंतिका म्हात्रे

नागोठणे आणि वडखळ पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत वाघ्रणवाडी परिसरातील जंगलात सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर धडक कारवाई केली . पोलिसांच्या पथकाने जंगलात तब्बल 15 किलोमीटर आत जाउन हा दारूचा अड्डा उध्वस्त केला . 
याबाबत सविस्त वृत्ते असे की ;  वाघ्रणवाडी येथील जंगल परिसरात बेकायदेशीर रित्या गावठी दारूची निर्मिती करून ती विक्रीसाठी साठवून ठेवली असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती . 
      या माहितीच्या आधारे रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल अप्पर पोलीस आयुक्त अभिजीत शिवतरे आणि पेंडसे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल   यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखण्यात आली पोलीसांना ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव व त्यांच्या पथकासह वाघ्रणवाडीच्या जंगलात जाउन गावठी दारू हातभट्टीवर पोलिसांनी दारू तयार करण्याचे साहित्य आणि मुद्देमाल जप्त करत  पूर्णपणे नष्ट केले . याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या कारवाईस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनकर करत आहेत.