Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️कारावी गावात गावठी दारू विक्री जोमात; दारूविक्रेते जोमात पोलीस प्रशासन कोमात असे नागरिकांून वक्तव्य .

Responsive Ad Here

   ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे


पेण तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या हार्दिक करावी गावात मोठ्या प्रमाणात गावठी दारू विक्री जोमात होत असल्याचे निदर्शनास येत आहे .
     याबाबत सविस्तर वृत्त असे की करावी गावातील शैलेश यशवंत मोकल व रामनाथ यशवंत मोकल असे दोन भाऊ गावठी दारू विक्रीचा धंदा जोमात करत असल्याचे समजते . सदर धंदेवाल्यांकडून परप्रांतिय नागरिक मोठ्या प्रमाणात दारू खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत .
या दारू धंद्यामुळे गावातील तरुनपीढी वाम मार्गाला चालली आहे त्यामुळे गावात  भांडणतंटेचा विषय निर्माण झाला आहे . नागरीकांतून दारू विक्रेते जोमात पोलीस प्रशासन कोमात असे वक्तव्य देखील बोलले  जात आहे .या याबाबत वडखळ पोलीस ठाण्याच्या ठराविक पोलीसांना माहिती असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही .
     येथिल पत्रकार अवंतिका म्हात्रे यांनी चौकशी केली असता सदर इसम पोलीसांना हाप्ते देत असल्याचे निदर्शनास येत आहे . याबाबत लवकरच जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात येणार असल्याचे समजते .