Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️कोकण विधान परिषद निवडणुकीत रंगत; 6 उमेदवारांची 12 नामनिर्देशनपत्रे दाखल!

Responsive Ad Here

✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी मंगळवारी छाननी प्रक्रिया महाराष्ट्र विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 6 उमेदवारांनी 12 नामनिर्देशनपत्रे दाखल केली असून, मंगळवारी या अर्जांची छाननी होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 मे रोजी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी एक नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आणखी पाच उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले.
यामध्ये सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी चार, अरविंद पुंडलिक म्हात्रे (शेतकरी कामगार पक्ष) यांनी एक, मानसी संतोष म्हात्रे (शेतकरी कामगार पक्ष) यांनी एक, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी एक तसेच अनिकेत सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) यांनी चार नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. अशाप्रकारे या निवडणुकीसाठी एकूण सहा उमेदवारांकडून 12 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. आता मंगळवारी अर्जांची छाननी होणार असून, त्यानंतर वैध उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल. कोकणातील या महत्त्वाच्या विधान परिषद निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.