Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️वडखळमध्ये गुटखा-पानमसाला साठवणूक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल*

Responsive Ad Here
✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

पेण तालुक्यातील वडखळ परिसरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री व साठवणूक करणाऱ्या तिघांविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न सुरक्षा अधिकारी विशाल नारायण इधारे (वय २८) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, आरोपी सुजा राम देवासी (वय २३, रा. वडखळ), अनंत मदन महापात्रा (वय ४२, रा. कुंदाताई नगर, वडखळ) आणि अजित कुमार दास (वय ४८, रा. वडखळ) यांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्रीसाठी साठवणूक केली होती. संबंधित पदार्थ सेवनामुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो, याची माहिती असूनही आरोपींकडून विक्री सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कारवाईदरम्यान विविध प्रकारचे विमल पान मसाला व व्ही-१ सुगंधित तंबाखूचे एकूण ५४४ पाउच जप्त करण्यात आले. जप्त मालामध्ये जंबो, बिग आणि किंग पॅकचा समावेश असून त्याची एकूण किंमत ५ हजार २४ रुपये इतकी आहे. हा गुन्हा २७ मे २०२६ रोजी दुपारी उघडकीस आला. या प्रकरणाचा पुढील तपास वडखळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक सपोनि विजय जाधव हे करीत आहेत.
    वडखळ ठिकाणी केलेल्या धंद्याची छाननी करता सदर गुन्हे आसपासच्या ठिकाणी म्हणजेच गडब कासु 'तसेच पेण विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मग फक्त वडखळ येथेच रेट का टाकली असावी असा जनमानसात संशयास्पद चर्चा सुरू आहे .