गडब/अवंतिका म्हात्रे
निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसह उत्कृष्ट पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा श्रीक्षेत्र माहूर येथे आयोजित करण्यात आला आहे. शहर व ग्रामीण भागात पत्रकारिता करताना पत्रकारांना समाजकंटकांकडून त्रास सहन करावा लागतो. तसेच सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण पत्रकारांना एक व्यासपीठ मिळावे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता
यावे, या उद्देशाने
राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या संकल्पनेतून निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघ' या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघाचा वर्धापन दिन येत्या ५ जून रोजी आहे. या दिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन ५ जून रोजी माहूर येथे करण्यात आले आहे. उत्कृष्ट पत्रकार, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, कृषी. आरोग्य, उद्योग, अध्यात्म,
कायदेविषयक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच निर्भयपणे व निःपक्षपातीपणे पत्रकारिता करणाऱ्या शहरी व ग्रामीण पत्रकारांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे पत्रकार हा लोकशाहीचा खरा चौथा स्तंभ आहे. तो तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडतो. मात्र, त्याला संरक्षण व सन्मान मिळत नाही. त्यामुळे आम्ही ही संघटना उभी केली. या सोहळ्याच्या
माध्यमातून चांगले काम
करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले. या वर्धापन दिन व सन्मान सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्व पत्रकार बांधवांनी, तसेच महाराष्ट्रातील निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी केले आहे.