Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

✨♦️✨ पेणची सुकन्या सुचिता म्हात्रे यांना स्वराज्यभूमी रायगड गौरव पुरस्कारे सम्मानित✨♦️✨

Responsive Ad Here
गडब / अवंतिका म्हात्रे
     स्वराज्यभूमी रायगड गौरव संमेलन २०२६ हा भव्य आणि दिमाखदार सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. आई फाउंडेशन, रायगड (भारत) व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये मा. सुचिता रमण म्हात्रे यांना “महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून उपस्थितांकडून त्यांचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. डॉ. विनोद राव मोरे यांनी भूषविले, तर प्रमुख अतिथी म्हणून मा. अजय तपकिरे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मूल्यांची प्रेरणा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक विचारांचा गौरव यावेळी अधोरेखित करण्यात आला.
उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे रायगड जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाची सांगता आनंददायी वातावरणात करण्यातरायगडात ‘स्वराज्यभूमी गौरव संमेलन २०२६’मध्ये मा. सुचिता रमण म्हात्रे यांना ‘महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार’
रायगड : आय फाउंडेशन, रायगड (भारत) व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वराज्यभूमी रायगड गौरव संमेलन २०२६’ या भव्य सोहळ्यात मा. सुचिता रमण म्हात्रे (अध्यक्ष, सरस्वती शैक्षणिक संस्था, पेण, रायगड) यांची ‘महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे.
आपल्या कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणे व निष्ठेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येत असल्याची माहिती निवडपत्रातून देण्यात आली आहे. रायगडच्या ऐतिहासिक वारशाची प्रेरणा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मूल्यांची परंपरा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन करत समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
या मानाच्या सन्मानामुळे मा. सुचिता म्हात्रे यांच्या कार्याचा गौरव होत असून त्यांच्या कार्याला व्यापक पातळीवर मान्यता मिळाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हा पुरस्कार सोहळा शुक्रवार, दि. ३ एप्रिल २०२६ रोजी महाङ येथे रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
संमेलनाध्यक्ष म्हणून मा. डॉ. विनोदराव मोरे उपस्थित राहणार असून, अभिनेते मा. अजय तपकिरे यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
👉 मा. सुचिता रमण म्हात्रे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठित सन्मानामुळे रायगड जिल्ह्याचा अभिमान वाढला असून त्यांच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. आली.
✨ “कर्तृत्वाचा गौरव… रायगडचा अभिमान