Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️मौजे पेण शहरात असलेले बोरगांव येथील सेलीब्रेशन रिसोर्टमध्ये चालु असलेला बेकायदेशीर वेश्याव्यवसायावर पेण पोलीसांचा छापा आरोपीस केले जेरबंद.♦️♦️

Responsive Ad Here

✍🏻गडब/अवंतिका म्हात्रे*

मौजे बोरगांव ता. पेण जि. रायगड हद्दीत सेलीब्रेशन रिसोर्टमध्ये बेकायदेशीररित्या वेश्याव्यवसाय चालत आहे. अशी गुप्त बातमीदारामार्फत गोपनिय माहिती श्री. संदीप बागुल पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे यांना मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी मा. वरीष्ठांना कळवुन वरीष्ठांनी दिलेल्या सुचना प्रमाणे छापा कारवाई करीता वेगवेगळे दोन पथक तयार केले. सदर पथकांना योग्य त्या सुचना देवुन सदर बातमीची खात्री करण्याकरीता श्री. संदीप बागुल पोलीस निरीक्षक स्वतः व नेमलेल्या दोन पथकासह मौजे बोरगांव येथील सेलीब्रेशन रिसोर्टमध्ये दि. २३/०३/२०२६ रोजी रात्रौ २०.४० वा.चे दरम्यान दोन बनावट ग्राहक पाठवुन केलेल्या छापा कारवाई मध्ये आरोपीत १) झुल्फीकार जलाल उद्दीन वय ३० वर्षे रा. रूम नंबर १३ मस्जीद जवळ, कोनगाव पनवेल व तेथील कामगार २) खगेंद्र कंम्बु मलीक वय ४३ रा. सेलिब्रेशन रिसॉर्ट पेण ता. पेण जि. रायगड व ३) देवेंद्र धर्मा पाटील वय ३६ वर्षे रा. मु. पो. रावे धोंडपाडा आळी ता. पेण, व कुंटणखाना चालविणार ४) रविंद्र खेत्रमोहन मलीक बय ३२ वर्षे रा. कुरूळ आशिर्वाद हॉटेल ता. अलिबाग जि. रायगड यांने संगणमताने वेश्याव्यवसायासाठी ३ महिला आणुन स्वतः चे आर्थिक फायदयासाठी सार्वजनिक ठिकाणी कुंटणखाना चालवुन त्यांचेकडुन वेश्याव्यवसाय करून घेतला म्हणुन त्यांचे विरूध्द सरकारतर्फे श्री. निलेश राजपूत सहा. पोलीस निरीक्षक यांनी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

सदर छापा कारवाई पंचनामा दरम्यान २१००/- एकुण रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर आरोपीत विरूध्द पेण पोलीस ठाणे गु.र.नं. ४७/२०२६ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १४३ (३), ३(५) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधि. १९५६ चे कलम ३,४,५ दि. २४/०३/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीत यांना आज रोजी अटक करण्यात आलेली आहे. तसेच वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या ३ पिडीत महिलांची सुटका करण्यात आलेली आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीम. आंचल दलाल मॅडम, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अभिजीत शिवथारे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. जालिंदर नालफुल, यांच्या सुचनाप्रमाणे पेण पोलीस ठाणेकडील १) श्री. संदीप बागुल, पोलीस निरीक्षक १) श्री. निलेश राजपूत सहा. पोलीस निरीक्षक, ३) श्रीमती. शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस उपनिरीक्षक, ४) श्री. घरत, सहा. पोलीस उपनिरीक्षक, ५) पोहवा/१४२४ श्री. सुशांत भोर्टर, ६) पोहवा/१३५२ श्री. सागर खांडसकर, ७) पोह/२२९७ श्री. निलेश कदम ८) मपोह/१६६ सुषमा भोईर, ९) मपोशि/६०८ रोहीणी भोईर यांनी केले आहे.