Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️पेण तालुका ५३ व्या विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन.. ११०विविध विषयावरील प्रतिकृती प्रदर्शनात सहभागी.. ♦️

Responsive Ad Here

        ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

पेण पंचायत समिती शिक्षण विभाग पेण तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ आणि एन.व्ही. जी. एज्युव्हेंचर्स फाउंडेशन्स कोनायसन्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने  विकसीत आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान तंत्रज्ञान या मुख्य विषयावर आयोजित ५३,वे पेण तालुका विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन गटविकास अधिकारी गजानन लेंडी,पेण तहसीलदार कार्यालयचे नायब तहसीलदार नितीन परदेशी निवासी नायब तहसीलदार प्रसाद कालेकर पेण नगरपालिका प्रशासन अधिकारी गणेशसींग ठाकूर आणि कोनायसन्स हायस्कूल अध्यक्ष डॉ.मनिष वनगे आणि डॉ. सोनाली वनगे गटशिक्षण अधिकारी शर्मिला शेंडे या प्रशासनातील अधिकारी वर्गाने उद्घाटन उरकून घेतले. निमंत्रण पत्रिकेवर राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधीची नावे ठळक अक्षरात देऊन देखील या नेतेमंडळीच्या उपस्थितीअभावी गैरहजेरीत शेवटी अधिकारी वर्गाला कैची हातात घेऊन फीत कापून विज्ञान  प्रदर्शनाचे उद्घाटन करावे लागले..  
      दोन दिवस चालणाऱ्या या पेण तालुका स्तरावरील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि शिक्षकांसाठी शैक्षणिक  साहित्य निर्मिती यामधे प्राथमिक गटात ६०, माध्यमिक गटात ४० तर शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात १०असे एकुण ११० विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनात सहभागी झालेल्या असून  घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, उर्जा बचत, आपत्ती निवारण धोके दर्शन सायरान, एकात्मिक गटशेती, कच-यापासून वीज निर्मिती  जलसंधारण आणि वितरण आणि मनोरंजनातून गणित विषयाची आवड या  दिलेल्या उपविषयावर मॉडेल मांडण्यात आल्या आहेत.तालुका स्तरावरील शेवटचे विज्ञान प्रदर्शन अखेर आजपासून उद्या सायंकाळपर्यंत सुरू राहणार असून निसर्गरम्य अशा निवांत ठिकाणी दोन दिवस विद्यार्थ्यांना मनमोकळ्या प्रसन्न वातावरणात आपल्या सादर केलेल्या विषयावर परिक्षकांना प्रेझेंटेशन देऊन जिल्हा प्रदर्शनासाठी कशी निवड होईल यासाठी कौशल्यपूर्वक पद्धतीने पारितोषिक प्राप्त कसे होईल ही कसोटी लागणार आहे. उद्या सायंकाळी पारितोषिक वितरण होऊन हा बालवैज्ञानिकाचा मेळाव्याची सांगता होणार आहे..