गडब/सुरेश म्हात्रे
पेण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय खासदार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असताना पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खासदार सुनील तटकरे यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा व पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन गांधी मंदिर सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती उपसभापती तैलेश गणपत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रावे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य चंदन पाटील, पांडुरंग पाटील, अविनाश पाटील दिलीप पाटील साहिल पाटील यांच्यासह हमरापुर विभागातील दादर कळवे जिते बळवली कोपर तसेच पाबळ वाशी येथील शेकाप, उबाठागट शिवसेने सह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संकेत आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी मोठ्या संख्येत पक्ष प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी पक्षात आमदारानिकेत तटकरे यांनी स्वागत केले तसेच तालुक्यात विशेष काम करणा-या नवदुर्गाचाही सत्कार करण्यात आला यामध्ये रितू हरिचंद्र पाटील, नलिनी परशुराम पवार, जयश्री अविनाश सावंत, गीता हरिराम भानुशाली, जयश्री पाटील या नवदुर्गाचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष दयानंद भगत, शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर, पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील, मा. नगरसेवक निवृत्ती पाटील, शहर युवक अध्यक्ष सागर हजारे, पेण विधानसभा महिला अध्यक्ष वसुधा पाटील, महिला तालुकाध्यक्ष चैताली पाटील, शहर अध्यक्ष सुचिता चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.