गडब/सुरेश म्हात्रे
पेण तालुक्यातील खरोशी या ठिकाणी डोंगरदन्यांच्या बुकीत सर्वपरिचित अशी स्वयंभू, गावत आणि सदैव जगृत असणारी श्री केळंबादेवी मक्तांचे श्रद्धास्थान आहे. फार फार वर्षापूर्वी इथे डोंगर माथ्यावर ऋषीचे वास्तष्य होते असे काहीसे दाखले आहेत. बाळगंगा नदीच्या काठावरून या पवित्र ठिकाणी जाताना रस्त्याच्या दुतर्स अनेक झाडे आहेत.
देवीच्या दर्शनासाठी जाताना निसर्गाचा आविष्कार असलेला हिरवागार रम्य परिसर पाहून मनाला एक प्रकारची शांती लाभते. मंदिराच्या परिसरात बेल आणि केळीची मोठ्या प्रमाणात झाडे होती परंतु कालपरत्वे त्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याचप्रमाणे चाफा, रामनूक, कणेरी, कांटोप या सारख्या फुलझाडांनी परिसर फुलून गेलेला असतो. अशा निसर्गरम्य आणि शेकडो फुट उंचीवर श्री केळबादेवीचे वास्तव्य आहे.
या गावाच्या सरहद्दीला लागूनच सदाट जंगल होते. येणाऱ्या जाण्णन्या लोकांना तसा हा भाग पूर्वीही भयावह वाटत होता. या जंगलात अनेक लहान मोठे प्राणी असत. या गावातील गावकयांना पूर्वी शिकारीचा फार मोठा छंद होता. होती आणि मोलमजूरी यावरच गावकभी आपली उपजिविका करत असत. याच जंगलामध्ये केळीच्या पुष्कळ बागा असल्याने गावकनी अनेक चांगल्या कामासाठी केळीच्या पानांचा उपयोग करत असत. एके दिवशी असेच गावातील एक गृहस्थ केळीची
पाने आभण्यासाठी याच डोंगर माथ्यावर गेले आणि केळीची पाने तोडग्याऐवजी संपूर्ण केळीचे झाड तोडण्यास सुरुवात केली. हे झाड तोडत असतानाच केळीच्या झाडातून रक्त बालू लागले. हा सर्व प्रकार पाहताथ तो गृहस्थ धाबरला आणि सदसया प्रकारची माहिती व्याने गावकऱ्यांना सांगितली. ते दृश्य पाहून गावकरीही आश्वर्यचकित झाले.
याबाबत गावक-यांनी एका निष्यात ज्योतिषाकडे जाऊन चर्चा केली. या ज्योतिष्याने गावक-यांना सांगितले कि, निश्चितच याठिकाणी परमेश्वराचे स्थान आहे. या ज्योतिष्याच्या सांगण्यानुसार गावक-यांनी तेथे शोध केला असता त्या ठिकाणी मोठे पाषाण असल्याचे निदर्शनास आले. ज्या ठिकाणी हा पाषाण मिळाला त्याला देवीचे स्थान देऊन त्या ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली. केळीच्या पानातून प्रकट झालेल्या मातेला श्री केळंबादेवी असे नाव देण्यात आले अभी अख्यायीका आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवसांध्या कालावधीत रायगडच्या कानाकोप-यातून अनेक मतगण मोठ्या प्रमाणात देवीच्या दर्शनासाठी येतात. आजतागायत श्री केळंबादेवी
जागृत असल्याची अनेक भक्तगणांना प्रचिती आली आहे. संकटकाळी तिचे नामस्मरण केल्यास ती संकट निवारणासाठी धावून येते.
इ.स. १६०८ सालापासून ते आजपर्यंत देवीच्या अनुभवाची प्रचिती भाविकांना आली आहे. दिवसेंदिवस मक्तीचा महिमा वाढल्याने लोकांची देवीवरील श्रद्धा बाढत गेली असल्याने नवरात्रोत्सवात नवस फेडण्यासाठी मविकांची रिध लागलेली पहावयास मिळते. या वर्षों जवळपास लाख ते दोन लाखा मान्यवर दर्शनाचा
लाभ घेणार आहेत. दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी चहा-नाक्ताधी सोय केली जाते व दर्शनाला येणाযা भाविकांना त्रास हेमू नये म्हणून भाविकांना लाइनीची व्यवस्था स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या नवरात्री उत्सवात स्थानिक शवकन्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होते. साधारणतः प्रत्येक दुकानदार हा नऊ दिवसात लाख रूपयांचा धंदा करतात, त्यामुळे श्रध्देबरोबर स्थानिकांना व्यवसायाची संधी मिळत असल्याने माता वेचांबादेवी तीर्थस्थळ व पर्यटन स्थळ म्हणून शासनाने विकसित करावा, अशी गावक-यांची मागणी होत आहे. भविष्यात बाळगंगा धरणा पूर्ण झाल्यास या परिसरात धरणाच्या पाण्यावर दुबार शेतीचा प्रयोग देखील करता येईल. एकंदरीत वेळबादेवी तिर्थस्थान है पर्यटन विकासासाठी भविष्यात लाभदायक आहे.