✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
दिनांक 05 जून 2025 रोजी गोपीकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे किनवट-माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचे उद्घाटक म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या देशव्यापी वर्धापन दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांची उपस्थिती होती. तर विशेष उपस्थिती म्हणून विजय सूर्यवंशी विभागीय अध्यक्ष, परमेश्वर पेशवे, विभागीय संघटक नांदेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते .