गडब/सुरेश म्हात्रे
पेण, रोहा, महाड आणि नागोठने परिसरात भंगार चोरांचा हैदोस थांबण्याचं नाव घेत नाही. JSW स्टील कंपनीसह इतर औद्योगिक कंपन्यांमधून भंगार आणि स्टील चोरीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. या चोरट्यांच्या टोळया बिनधास्तपणे कारखान्यांच्या सुरक्षेला न जुमानता लाखो-करोडो रुपयांचा माल लंपास करत आहेत. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिस प्रशासन या गुन्हेगारी कारवायांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. पोलिस आणि भंगार माफियांमधील अर्थपूर्ण संबंध उघड्यावर येत असून, पोलिसांची ही निष्क्रियता आणि भ्रष्टाचारपूर्ण वृत्ती स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण करत आहे.
JSW स्ञील कंपनी, जी पेणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, तिथे भंगार चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सूत्रांनुसार, चोरटे रात्रीच्या अंधारात कंपनीच्या गोदामांमध्ये घुसून मौल्यवान स्टील, लोखंडी सळया, पाइप आणि इतर
मूल्यवान सामग्री चोरतात. रोहा, महाड, नागोठने, खोपोली आणि तळोजा येथील औद्योगिक पट्टयातही असेच प्रकार घडत आहेत. या चोरीमुळे कंपन्यांचे करोडो रुपयांचे नुकसान होत आहे, आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे. पण पोलिस प्रशासन, ज्यांचं कर्तव्य गुन्हेगारांना आळा घालणं आहे, ते भंगार माफियांशी हातमिळवणी करून उद्योगांचा आणि सामान्य नागरिकांचा विश्वासघात करत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, पेण, खोपोली आणि तळोजा परिसरात अनेक परप्रांतीय, विशेषतः मुस्लिम समाजातील
भंगारवाले येऊन बस्तान बांधून बसले आहेत. हे भंगारवाले कंपनीतील मूळ सामग्रीकृलोखंडी सळ्या, पाइप, आणि इतर मौल्यवान वस्तृकृचोरून त्यांच्या दुकानांमधून विकतात. लाखो-करोडो रुपयांची माया जमवणारे हे भंगारवाले स्थानिकांवर दादागिरी करतात आणि कोणालाही जुमानत नाहीत. याचबरोबर, त्यांच्या दुकानांजवळ डिझेल, पेट्रोल आणि इतर ज्वलनशील पदार्थ टँकरमधून चोरून विकले जात असल्याचं उघड झालं आहे. हे परप्रांतीय भंगारवाल्यांचं काळं कारस्थान आहे, आणि यावर पोलिसांचा आशीर्वाद आहे, असा गंभीर आरोप स्थानिक करत आहेत.
पोलिस प्रशासनाची ही लाचखोर, भ्रष्ट आणि निष्क्रिय भूमिका म्हणजे कायद्याची थट्टा आहे. अनेकदा चोरीच्या तक्रारी देऊनही पोलिस कारवाई टाळतात, तपासाला विलंब करतात, किंवा चोरांना पकडूनही तात्काळ सोडून देतात. पोलिसांचं हे साटेलोटे आणि गुन्हेगारांना पाठिशी घालणारं वर्तन म्हणजे स्थानिक उद्योजक आणि नागरिकांसाठी अन्यायकारक आहे.