Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

जेएसडब्लूच्या प्रदुषणाचा स्थानिकांना फटका

Responsive Ad Here

गडब/सुरेश म्हात्रे
🟦पेण-अलिबाग रस्त्याची दुरवस्था, अवजड वाहनांमुळे होणारे अपघात, वाहतूक कोंडी अशा एक ना अनेक कारणांमुळे वडखळ येथील जेएसडब्ल्यू कंपनी चर्चेत असते. यामध्ये सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रदुषण. याबाबत अनेक तक्रारी करुनही, ग्रामस्थांचा विरोध झुगारुन डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या मनमानी कारभाराला महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळही 'अर्थ'पूर्ण सहकार्य करीत असल्यामुळे स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वडखळ येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रदुषणाचा फटका पेण व अलिबाग तालुक्याला सर्वाधिक प्रमाणात बसतो. पेण-अलिबाग मार्गावरुन प्रवास करताना त्याचा प्रत्यय प्रत्येकालाच येतो. कंपनीतील धूरामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे आजार जडले आहे.
मात्र तरीही कंपनीतून
प्रदुषण होत नसल्याचा दावा कंपनी प्रशासनासह प्रदुषण मंडळाकडूनही केला जात आहे, ही दुदैवी बाब आहे.
चा कंपनीतील प्रदूषणाविरोधात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी संबंधित यंत्रणा मात्र सोयीस्कररित्या काणाडोळा करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना प्रदुषणाचा त्रास
सहन करावा लागत आहे. कंपनीकडून हरितपट्टा नियम धाब्यावर बसवण्यात आल्याने नागरिकांना कंपन्यांमधून निघणाऱ्या धूर आणि वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो.
दुसरीकडे प्रदूषण मंडळाचे अधिकारी कारवाई करताना नियमाला बगल देत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
त्रास स्थानिकांना, रोजगार परप्रांतियांना*
औद्योगिकीकरण म्हटल्यावर प्रदूषणासह रोजगारही येतो. मात्र अलिबाग आणि पेणकरांच्या नशिबी उपेक्षाच असल्याचे दिसून येते.
कारखाना पेणमध्ये असून स्थानिकांना रोजगाराच्या संधीतून कंपनीने अनेकदा डावलले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
त्यामुळे प्रदूषण पेण व अलिबाग तालुक्याने सहन करायचे, मात्र रोजगार परप्रांतियांना द्यायचा, हे कंपनी प्रशासनाचे तत्त्व पेण व अलिबाग तालुक्याने का मान्य करावे, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.