Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय नेमबाज किसन खारके याने मिळवले सुवर्ण पदक

Responsive Ad Here
✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
दिनांक 19 ते 25 नोव्हेंबर2024 दरम्यान  0755 ओपन शूटिंग कॉम्पिटिशन भोपाळ मध्यप्रदेश येथे संपन्न झाली 50 मिटर फ्री पिस्टल नेमबाजी मध्ये राष्ट्रीय नेमबाज किसन खारके नेरे पनवेल यांनी महाराष्ट्र चे प्रतिनिधित्व करत सुवर्ण पदक मिळवून 20 डिसेंबर 2024 दिल्ली येथे होणाऱ्या 67 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धे करिता निवड झाली आहे, त्याच्या ह्या निवडीबद्दल सिद्धांत रायफल क्लब रायगड चे पदाधिकारी प्रितम पाटील,महेश फुलोरे, अजिंक्य चौधरी,समाधान घोपरकर,अविनाश भगत,प्रकाश दिसले, हेमंत भगत,सॅम भगत,सुरज थळे, श्रीकांत म्हसकर,सुनील मढवी, अलंकार कोळी,राजू मुंबईकर, विक्रांत देसाई, मयूर पाटील तसेंच इंडियन मॉडेल जुनिअर कॉलेज उलवे येथिल प्रिंसिपल गौरी शाह व नेरे येथील ग्रामस्थ तसेच असंख्य मित्र परिवार यांनी या यशाबद्दल व निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.