गडब/सुरेश म्हात्रे
⬛रेल्वे प्रशासनाकडून जमिन संपादित न करता शेतकऱ्यांच्या जागेतून संरक्षण भिंतीचे काम सुरु केल्याने तसेच ग्रामदैवत बापदेव महाराज मंदिराच्या दर्शनी भाग बंद करण्याचा प्रयत्न केल्याने संतापलेल्या अष्टमीकर जनतेने आक्रमक होत हल्लाबोल केला. या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी खा. सुनील तटकरे व ना. अदिती तटकरे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. ना. अदिती तटकरे घटनास्थळी भेट देवून जोपर्यंत जिल्ह्याधिकारी व रेल्वे खात्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होत नाही, तोपर्यंत काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
रोहा रेल्वे स्टेशनच्या अष्टमी गाव हद्दीत काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सीमेवर संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरु केले आहे. संपादित जागेत संरक्षण भिंतीचे काम झाल्यानंतर लगतच्या शेतकऱ्यांना कोणत्याही
प्रकारची पूर्वकल्पना न देता व जमिन संपादन न करता थेट भिंतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरु केले. नियोजित जागेपेक्षा १८ मीटर आत खोदकाम केल्याने शेतकऱ्यांनी हल्लाबोल केला. तसेच या कामाला विरोध केला. या दरम्यान ना. अदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली.
ही जागा प्रस्तावित असून संपादित नाही.
त्यामुळे भूसंपादन नसताना व शेतकऱ्यांना याविषयी कोणतीही पूर्वकल्पना न देता काम सुरु केल्याची बाब शेतक-यांनी ना. अदिती तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराबद्दल मंत्री अदिती तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जोपर्यंत जिल्हाधिकारी व रेल्वे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा होत नाही, तोपर्यंत काम थांबविण्याचे आदेश काम बंद करण्याचे आदेश
दिले.
यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मुख्याधिकारी पंकज भुसे, रेल्वे खात्याचे असिस्टंट इंजिनियर संजू सिंग, डिव्हीजनल इंजिनियर पी. डी. वाडेकर, नगरपालिका अभियंता सुधीर भगत, अष्टमी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष महादेव साळवी, मुस्लिम समाज अध्यक्ष शफी पानसरे, मयूर दिवेकर, महेश कोलाटकर, मयूर पायगुडे, अमित उकडे, मजीद पठाण, मुनवर पठाण, लियाकत सवाल, मुबीन कर्जिकर, रिदवान नाडकर, मनोज लांजेकर, सुनील चव्हाण, तन्वीर कर्जिकर, सागर भोबड, संजय देऊळकर, प्रसाद खुळे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते