Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्य बळकटीकरणासाठी राज्यशासन कटीबद्ध - आदिती तटकरे

Responsive Ad Here
गडब / सुरेश म्हात्रे

    १३ हजार मिनी अंगणवाड्यांचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी संबंधितांना दिले .
    पाली येथील बल्लालेश्वर भुवन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . लेझीमच्या गजरात व अंगणवाडी च्या लहान मुलांनी गुलाबाचे फुल देऊन महिला व बालविकास मंत्री आदीतीताई तटकरे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले . यावेळी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, महिला व - बालविकास विभाग जिल्हा परिषद रायगड मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी तहसिलदार जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पाली येथिल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पेण तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थित होते.
       अंगणवाडी सेविकांसाठी राज्य शासनामार्फत पेन्शन योजना लागू करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. ती लवकस्व पुर्ण होईल तसेच ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची विभागामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. याबरोबरच कुटुंबियांची देखील मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात येत
असल्याचे आदितीताई तटकरे यांनी कार्यक्रमात सांगितले. लेक लाड़की या शासनाच्या महत्वकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना दिल्या. व या योजनेच्या लाभार्थ्याना लेक लाडकी योजना पाहिला हप्ता धनादेश देण्यात आला . राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोनचे वाटप करण्यात आले आहे. पोषण ट्रॅक्टर पच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांतमार्फत अंगणवाडीच्या १०० टक्के लाभाध्यांची नोंद ऑनलाईन करण्यात येणार असून लाभार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवांची नोंद त्यामध्ये घेता येणार आहे असेही तटकरे यांनी सांगितले.
   अंगणवाडी केंद्रांना 'स्मार्ट किट वाटप खेळणी साहित्य इत्यादी वस्तू पुरविण्यात येऊन अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक, बौद्धिक व शारीरिक विकासाला पूरक असे वातावरण करण्यात येणार असल्याचे सांगीतले . जिल्हा परिषद निधीच्या माध्यमातूनही महिला, मुली यांना एमएससीआयटी, सायकल वाटप, शिलाई मशीनचा लाभ डीबीटी द्वारे दिला जातो. त्याचप्रमाणे महिला बचत गटाचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी मसाले चक्की, दळण मशीन, ई-रिक्षा देखील देण्यात आल्या .