गडब/सुरेश म्हात्रे
⬛पेण येथील आरडीसीसी बँकेच्या एटीएममशीन मधून बनावट एटीएएम कार्डद्वारे १० हजार रुपये काढणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दि. १६ मार्च रोजी सकाळी ११: ०० ते दुपारी ३ : ३० च्या दरम्यान पेणमधील आरडीसीसी बँकेच्या एटीएम मशीनमधून वेगवेगळ्या नावाच्या एटीएम कार्डचा वापर करून १० हजार रुपये काढले होते. या प्रकरणी आरडीसीसी बँकेचे कर्मचारी मिलिंद पाटील यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजि. 78/2024 भा.दं.वि.कलम 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
पेण पोलिसांनी या प्रकरणी तपास करून अजय बळवंत सिंग ( वय २८) रा. नौबादपूर, कानपुर उत्तरप्रदेश, नितीन फत्तु सिंग, (वय १९) रा. टेओंगा. कानपुर, उत्तरप्रदेश या दोन भामट्यांना गजाआड केले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समद बेग हे करीत आहेत.