Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

एस.आर.कॉम्पेक्स बिल्डिंगचा सज्जा कोसळून सारा कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे नुकसान !

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

 पेण शहरातील एस.आर. कॉम्पेक्स बिल्डिंगचा सज्जा कोसळून तळ मजल्यावर असलेल्या सारा कन्स्ट्रक्शन कार्यालयावर पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सारा कन्स्ट्रक्शन कार्यालयाचे मालक यशवंत घासे त्यांच्या कार्यालयात आले असता सदरचा सज्जा त्यांच्या कार्यालयच्या दर्शनी भागात बांधलेल्या शेडसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू सीसीटीव्ही कॅमेरे, वातानुकूलित यंत्रणा डिजिटल बोर्डवर पडुन त्यांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
10 दिवसांपूर्वीही याच सज्ज्याचा काही भाग कोसळला होता. उर्वरित सज्ज्याचा भाग पाडताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा प्रबंध न केल्याने हा प्रकार घडला असल्याचा आरोप यशवंत घासे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
दुरुस्तीचे कामकाज करताना नगरपालिका किंवा इतर कोणत्या विभागाची परवानगी घेतली होती काय ? सदर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे की नाही ? जर इमारत धोकादायक असेल तर परवानगी कशी दिली ? असे अनेक प्रश्न यावेळी यशवंत घासे यांनी उपस्थित केले तसेच आपल्या झालेल्या नुकसानाची बिल्डरने तातडीने भरपाई करून द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
याबाबतची तक्रार पेण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनंतर नगरपरिषदचे बांधकाम अभियंता विनायक बनसोडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली व त्याचा आवाज लवकरच मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्याचे आश्वासन दिले. सदर इमारतीचा लवकरच स्ट्रक्चरलऑडिट करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली.