गडब / अवंतिका म्हात्रे
मोदी सरकार हे जनतेला टेपी लावण्याचे काम करत आहे केवळ जादूचे खेळ चालू आहेत पण जनतेला काही समजतच नाही, जीवनावश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने महागाई वाढली आहे आणि हे सरकार महिलांसाठी योजना न देता फसवणूक करत आहेत, आज जड अंतःकरणाने अर्थ संकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मांडला.
पण तो शेवटचा अर्थसंकल्प असेल. महिलांच्या मता साठी आता यांना महिलांची आठवण झाली आहे पण मणिपूरच्या महिलांवर झालेले अत्याचार यांना दिसत नाही दहा वर्षानंतर या सुटा बुटतील सरकारला गरिबांची आठवण झाली असल्याचे रोख ठोक वक्तव्य यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले.
लोकसभेमध्ये असणाऱ्या जेवढ्या विधासभा आहेत तिथे जाऊन जनतेशी संवाद साधण्यात येणारं आहे याची सुरूवात पेण रायगड लोकसभेमधील पेण विधानसभेमधुन होत आहे. आता रायगडमध्ये आपलेच खासदर व आमदार निवडून येतील असे सांगत भाजप व राष्ट्रवादीवर टीका करण्यात आली.
पेण येथे शिवसेना बाळासाहेब ठाकरे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले रोखठोक विचार मांडले.
_पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील - अनंत गीते_
रायगडाच्या पावन भूमीतून शिवसेना जन संवाद दौऱ्याची सुरूवात प्रथम पेण येथून होत असल्याने आपण भग्यावन आहोत. रायगड मध्ये सहा सभा घेण्यात येणार आहेत आपल्याला पहिली संधी मिळालेली आहे,
लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होणार आहे या निवडणुकीत २०ते२२ खासादर लोकसभेवर जाणार आहेत. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकारच येणारं आणि या सरकारमध्ये शिवसेनेला मानाचं पान मिळणार आहे. तर रायगड मावळ लोकसभेची जबाबदारी माझ्यावरआहे रायगडाचा खासादर मी होणारच पण मावळ मध्ये ही खासादार आपलाच असेल तसेच रायगडचे सात ही आमदार इंडिया आघाडीचे असतील असा विश्वास देत पुढचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असतील तर
लोकसभा व विधानसभेवर भगवा फडकत नाही तो पर्यंत स्वस्त बसणार नसल्याचा इशारा यावेळी माजी केंद्रित मंत्री अनंत गीते यांनी यावेळी बोलताना दिला.
याप्रसंगी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रित मंत्री अनंत गीते, नेते सुभाष देसाई, वरून सरदेसाई, मिलिंद नार्वेकर, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, आमदार विलास पोतनीस, बबन पाटील, संपर्क प्रमुख विष्णूभाई पाटील, सह संपर्क प्रमुख किशोर जैन, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुकाप्रमुख जगदीश ठाकूर, माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर, कमलाकर पाटील, समीर म्हात्रे, राजेश मोकल, शेकाप नेते महादेव दिवेकर, काँग्रस तालुकाध्यक्ष अशोक मोकल, काँग्रसे शहराध्यक्ष प्रवीण पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.