✍️गडब / अवंतिका म्हात्रे
शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात गणपती करिता प्रसिद्ध असलेल्या पेण शहरापासून पासून होत असून पुढील दोन दिवस उद्धव ठाकरे यांची मुलुख मैदान तोफ रायगड जिल्ह्यात धडाडणार आहे.
गुरुवारी सकाळी ११ वाजता पेण प्रायव्हेट हायस्कूल जवळील मैदानात जनसंवाद यात्रेचा शुभारंभ होत असून दुपारी ३ वाजता अलिबाग तालुक्यातील चौल येथील मैदानात सभा होणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता रोहा शहराजवळील एमआयडीसी बायपास रोड वरील उरुस मैदान मध्ये जनसंवाद यात्रा होणार आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोलादपूर येथील काळभैरवनाथ सहान येथे उद्धव ठाकरे जनसंवाद साधतील तर दुपारी ३ वाजता म्हसळा शहराजवळील दिघी रोड येथे जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे. तर सायंकाळी ६ वाजता माणगाव मोर्बा रोड वरील ग्राउंड वर जनसंवाद सभा होणार आहे.
शिवसेनेतून चाळीस आमदार फुटून शिंदे गटात गेल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावर असून या फुटीर आमदारांना विरोधात तसेच राष्ट्रवादी मधील कुटीर आमदारांसंदर्भात उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेमकी भूमिका व लोकसभा विधानसभेचे संभाव्य उमेदवार यांच्या नावाचा उलगडा या संवाद यात्रेत ते करतील काय ?याकडे इतर पक्षांचेही लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रा नंतर भाजपने बिहारमध्येही महायुती करून सत्ता प्रस्थापित केली आहे. ते सत्तेत भागीदार झाले आहेत. या व इतर राजकीय घटनांवर उद्धव ठाकरे कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. या गोष्टींचा खुलासा जनसंवाद यात्रेत होईल अशी चर्चा सर्वसामान्य सुरू आहे.