Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

पेण : तरणखोप येथे अवैध्य डिझेलचे दहा टँकर्स जप्त, ९ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, एक जेरबंद

Responsive Ad Here

*गडब/सुरेश म्हात्रे* 

 पेण तालुक्यातील तरणखोप हद्दीत पुरवठा विभागाच्या राज्य स्तरीय दक्षता पथकाने धड कारवाई करुन, डिझेलचे दहा अनधिकृत टैंकर जप्त करून एकुण- १, कोटी ४३, लाख०६, हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन ९ जणांना विरुद्ध गुन्हा दाखल करीत एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत पेण पोलिस ठाण्यात सुरेश शांताराम थळे (वय-५७ वर्षे व्यवसाय शासकिय नोकरी रा मु.पा. खंडाळा ता. आलिबाग जि. रायगड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार दिनांक २ जानेवारी २०२४रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तरण- खोप येथील हॉटेल शुभलक्ष्मी समोरील मोकळ्या जागेत ट्रक नंबर एम.एच.४६ बी.यु २३८८, टेंकर नं. एम.एच.०४ जी एफ ८०१७, टेंकर नं. एम.एच.एजी ४७५३, टेंकर नं. एम.एच.०४ जी एच एस. २२०३, ट्रक नंबर एम.एच.४६ बी.यु २३८८, ट्रक नंबर एम.एच.३४ बी जी ८१६७, ट्रक नंबर एम.एच.०४ जी आर ०५९७, ट्रक नंबर एम.एच.०४ जी एफ. ८०१७, ट्रक नंबर एम.एच.०२
एफ.जी ४७५३, ट्रक नंबर एम.एच.०४ एच.एस २२०३ या टँकर मधुन डिझेलची अवैध्यरीत्या वाहतूक व साठवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर राज्यस्तरीय दक्षता विभागाच्या विशेष पथकाने ही धाडसी करवाई केली.सर्व टँकरमधुन मिळून एकुण- १, कोटी ४३, लाख०६, हजार रुपयाचा डिझेल तस्करी पकडण्यात पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाला यश झाले आहे.
मोहम्मद अली, जहिर महम्मद लंबे, एम.एच.०४ एच. एस २२०३ चे मालक, एम.एच.०४ एच. एस २२०३ चे ट्रान्सपोर्ट, एम.एच.०४ जी एफ. ८०१७ चे मालक, एम.एच.०४ जी एफ. ८०१७ चे ट्रान्सपोर्ट, इश्तीयाक (पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही), राजु पंडीत (पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही), उस्मान (पुर्ण नाव गाव पत्ता माहित नाही) या नऊ आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आहे.
याबाबत पेण पोलिस ठाण्यात ०२/२०२४, भा.द.वि.सं.क. ४२०, जीवनावश्यक वस्तु, कायदा १९५५ चे कलमा ३,७,८, मोटार स्पिरीट, अन्ड हायस्पिड डिझेल (रेग्यलेशन ऑफ सप्लाय डिस्ट्रीब्युशन अॅन्ड पिव्हेन्श्न ऑफ माल प्रॅक्टीसेस ऑर्डर २००५ मधील कलम २ (ए), २(३), २ (एफ), २ (जी), २(टी) ३,३ (१५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक भोर करीत आहेत