Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️*कथा आहे दिव्यांग जिद्द आणि चिकाटीची*

Responsive Ad Here


कथा आहे दोन्ही पायाने 90%दिव्यांग असलेल्या साईनाथ पवार यांची यांचा जन्म अलिबाग तालुक्यातील चोंडी येथे एक सर्वसामान्य कुटुंबात झाला.
वयाच्या दुसऱ्या वर्षीअचानक ताप आला आई-वडिलांनी जवळच्या डॉक्टर कडे नेले
डॉक्टरांनी इंजेक्शन दिले .ताप काही कमी होत नाही म्हणून तालुक्याच्या डॉक्टरकडेे घेऊन गेले त्यांनी दुसऱ्या पायावर इंजेक्शन दिलेआणि तापात इंजेक्शन दिल्याने दोन्ही पाय निकामी झालेआई वडील कुणी सांगेल तसा उपाय ,देव धर्म आयुर्वेदिक सर्व प्रकारचे उपचार केले 
परंतु काही विलाज झाला नाही. त्यामुळे हातावरती लहान बाळासारखं रांगत चालवे लागत होते .लहान पणापासूनच शिक्षणाची आवड असल्याने आई-वडिलांनी शाळेत घातले. पहिली ते चौथी शिक्षण जवळच्या प्राथमिक शाळेत झाले.

पुढचं शिक्षण घरापासून अर्धा किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेण्यात आले घर ते शाळा हे अर्धा किलोमीटरचे अंतर रोज आई पाटकुळीवर (खांद्यावर ) वर घेऊन घर ते शाळेचा प्रवास चालू झाला. आई बरोबरच छोटा भाऊ वैजनाथ हा देखील स्वतः खांद्यावर घेऊन शाळेत जाऊ लागला अशा खडतर प्रवासात दहावीपर्यंत शिक्षण झाले.एक दिंवस जिल्ह्याच्या ठिकाणी अखिल भारतीय भौतिक चिकित्सालय हाजी अली यांचा दिव्यांग चेकअप कॅम्प होता या कॅम्पला तपासणी झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की जर ऑपरेशन केलं तर कॅलिपर च्या साह्याने तुम्ही उभे राहू शकता आणि हे ऐकल्यानंतर आपण देखील आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे असं वाटल्याने घरच्यांना सांगितले मला माझ्या पायावर शस्त्रक्रिया करायची आहे पहिल्यांदा घरचेही तयार होईना नातेवाईक मित्रमंडळी सारे घरच्यांना सांगत ऑपरेशन केल्यानंतर काय खरं नाही जीव जाऊ शकतो परंतु त्यांनी ठरवले रोजचं रेंगाळत मारण्यापेक्षा एकदाच काहीतरी होऊ दे आणि त्याचबरोबर घरच्यांनी साथ दिली 1995 झाली हाजी अली येथे अखिल भारतीय भौतिक चिकित्सालय रुग्णालयात दाखल करण्यात आले सर्व प्रकारच्या तपासण्या करून दोन्ही पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली जवळजवळ सहा महिने हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर सहा महिन्यांनी कॅलिपर व कुबड्याच्या साह्याने पहिल्यांदा उभा राहिलो. तो शनखरोखर लाखमोलाचा आणि आनंदाचा होता माझा आनंद गगनात मावेना जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभे राहिल्याचा आनंद हा वेगळा होता.
त्यानंतर जवळच्या कॉलेजमध्ये अकरावी बारावीचे शिक्षण पूर्ण केले शिक्षणाची आवड खूप आणि जिद्द आणि चिकाटी असल्याने पुढील शिक्षणासाठी घरापासून दहा किलोमीटर आंतर तालुक्याच्या ठिकाणी अलिबाग येथे जे स एम कॉलेजमध्ये तेरावी चे ऍडमिशन घेण्यात आली. आता रोज कॉलेजला जाण्यासाठी जवळील मित्रमंडळी ही रोज सकाळी जाताना कॉलेजला घेऊन जायची व कॉलेज सुटल्यानंतर घरी आणून सोडायचे यामध्ये प्रामुख्याने सुरज नारकर इरफान लोकरे आणि आसिफ आतार रोज स्कूटर वर आळीपाळीने कॉलेजला घेऊन जात BA चे शिक्षण पूर्ण झाले. संगणक प्रशिक्षण, मराठी इंग्लिश टायपिंग यासारखे कोर्स पूर्ण केले
       शिक्षण कालावधीतच एक चळवळ साईनाथ पवार यांनी चालू केली होती. पण आपल्या हक्कासाठी आपण नेहमी तयार असलं पाहिजे पहिल्या पासूनच होतं. युसुफ मेहर आल्ली
 सेंटर तार यांच्या पनवेल यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना एकत्र करण्यात आलं आणि खरी दिव्यांग बांधवांसाठी चळवळ सुरू झाली आणि मग सर्व तालुक्यांच्या आपल्या दिव्यांग मित्रांच्या साह्याने यांची कोणाचे प्रश्न असतील ते प्रत्येक महिन्याला क जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लोकशाही दिनाला मांडायचे आणि आपल्या दिव्यांग बांधवांचे प्रश्न सोडवायचं कार्यक्रम सुरू झाला. बरोबर नोकर भरतीसाठी बऱ्याच परीक्षा दिल्या आणि सन २००६ साली रायगड जिल्हा परिषद मध्ये लिपिक म्हणून निवड झाली. नंतरही दिव्यांग चळवळ ही थांबली नाही आज आपल्याला नोकरी मिळाली ,आपल्याला रोजगार मिळाला त्याचबरोबर इतर दिव्यांग बांधवांनाही आपल्या रोजगार मिळावा यासाठी त्यांनी दिव्यांग मेळावे मार्गदर्शन शिबिरे वेगवेगळे उपक्रम शासनाच्या मदतीने चालू केले. शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चार वर्षे काम केले सण 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर धावत आहेत. त्याचबरोबर इतर दिव्यांगांसाठी सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत.
   दिव्यांग बांधवांविषयी केलेल्या नाविन्यपूर्ण कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने दिव्यांग क्षेत्रातील राज्य पुरस्कार देऊन सन्मानित केले याचबरोबर दिव्यांग क्षेत्राच्या कामकाजाबाबत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत .
कोविड कालावधीमध्ये एनजीओ च्या साह्याने सहाशे दिव्यांगांना स्पेशल लसीकरण मोहीम राबवली तसेच गरजू दिव्यांगाच्या घरपोच केले तसेच आपत्तीच्या काळात,पुर परिस्थितीत कोकणामध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेले आहे
         स्वतः दोन्ही पायाने दिव्यांग असून ते स्पेशल स्कूटर तसेच अल्टर केलेली फोरविलर कार स्वतः त्यांनी दिवंगत्वावर मात केली आहे.

 *सुरेश.एस.म्हात्रे - गडब - पेण - रायगड* *संपर्क ९२७०४५६८१४*