Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

गौरी-गणपतीच्या सणाला अधिक मागणी* बांबू उद्योगातून 'रोजगारनिर्मिती'*

Responsive Ad Here

*गडब/अवंतिका म्हात्रे*

         कोणत्याही धार्मिक कार्यासाठी आवश्यक असलेल्या बांबूच्या वस्तू आणि खास गौरी गणपती सणाला आवर्जून गरज बनलेल्या (वस्तूंची मागणी असते. कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्यामध्ये राहणारे बारमाही व्यावसाय म्हणून बांबूच्या पातींपासून वस्तू निर्माण करतात. नेरळ येथील बाजारात बांबूच्या पतींपासून बनवलेल्या वस्तूंसाठी ठाणे जिल्ह्यातील लोक खरेदी करीत असतात*

       बांबुच्या पातींपासून बनविल्या जाणान्या दोपारा, लहान टोपल्या तसेच सूप आणि खेळण्यातील वस्तू बनविल्या जातात. या वस्तू बनविणान्या आदिवासी लोकांच्या वस्तूंना सणासुदीच्या काळात मोठी मागणी असते. सर्वांत मोठा सण असलेल्या गौरी- गणपतीच्या सणाला तर गौरी आवाहनाला नवीन टोपली आणि खूप आवश्यक असतात त्या टोपली आणि सुपांची निर्मिती हे लोक करीत असतात पोशीर, उंबरवाडी, चिंचवाडी, वारे आणि कच येथील आदिवासी या वस्तूंची निर्मिती करीत असतात. या वाड्यांतील प्रत्येक घरात बांबूच्या वस्तू बनविण्याचे काम वर्षभर सुरु असते. त्यासाठी जंगली भागातील सांगू विकत आणून आपली कारागिरी सुरु करतात.

        गणेशोत्सव काळात या तिन्ही गावातील महिला या नेरळ तसेच बदलापूर, कल्याण आणि कर्जत येथील बाजारात टोपली आणि सुपे विकण्यासाठी येत असताल तर पुरुष मंडळी घरात साहित्य बनविण्यात व्यस्त असतात. यातून स्थाना आर्थिक स्थिरता तसेच काचा रोजगार मिळत आहे.

📍उदरनिर्वाहाचा कायमचा व्यवसाय📍

*     कर्जत तालुक्यातील सहा आदिवासी यांमधील आदिवासी लोकांना बांबूच्या कारागिरीतून निर्माण होणान्या वस्तू यांचा आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी मदत होत आहे. त्या सहामधील आदिवासी लोकांनाच उदरनिर्वाहाचा हा कायमचा व्यवसाय आहे.*

📍वस्तूंचे दर

*गौरीसाठी लागणारी मोठी टोपली:२०० रुपये सूपः २०० रुपये तांदूळ निवडण्यास वापरले जाणारी सूपः१२० रुपये

केरसुणी ७० ते १०० रुपये*

*गौरीसाठी लागणारी मोठी टोपली:२०० रुपये सूपः २०० रुपये तांदूळ निवडण्यास वापरले जाणारी सूपः१२० रुपये

केरसुणी ७० ते १०० रुपये*