Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

Responsive Ad Here
कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी, महाआघाडीचे बाळाराम पाटील पराभूत

गडब/सुरेश म्हात्रे 

 कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांनी महाआघाडीचे बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे.
ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजार 648 मते मिळाली तर बाळाराम पाटील यांना 9 हजार 768 मते मिळाली.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. नवी मुंबईतील नेरुळ येथे मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॅा महेंद्र कल्याणकर हे काम पाहत होते.
28 टेबलवर मतमोजणी झाली. पाच जिल्ह्यातील शिक्षकांनी या निवडणुकीत 91 टक्क्यांपर्यंत मतदान केलं होते. मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर होते. शेवटच्या फेरीपर्यंत 20 हजार 648 मतांनी ते विजयी झाले.