Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

निगडेच्या सरपंच कल्पना म्हात्रे यांचे आ. महेंद्रशेठ दळवी यांच्याकडून अभिनंदन . फसवणूक करणाऱ्यांचे दिवस संपले

Responsive Ad Here




गडब / अवंतिका म्हात्रे


पेण तालुक्यातील निगडेच्या सरपंच

पदी विराजमान झाल्याबद्दल तसेच हॅट्ट्रीक सरपंच म्हणून विजयी झालेल्या कल्पना संजय म्हात्रे यांचे तसेच उपसरपंच पी.पी. म्हात्रे व सदस्य यांचे बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी अभिनंदन केले.

    यावेळी फसवणूक करणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत. त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दाखवून देऊ . तुम्हाला सर्वांना सोबत घेऊनच मी पुढे चालणार आहे. प्रामाणिकपणे जनतेची सेवा . मी करत आहे. येणाऱ्या काळात सरकारच्या करे माध्यमातून पेणचा विकास करण्यात येईल असे प्रतिपादन अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांनीकेले. यावेळी त्यांनी विजयी सरपंच, उपसरपंच, सदस्यांना पुढील वाटचालीसाठी हा शुभेच्छा दिल्या. यावेळी युवासेना रायगडजिल्हा प्रमुख संजय रघुनाथ म्हात्रे, सरपंच कल्पना संजय म्हात्रे, उपसरपंच पी.पी. म्हात्रे, सदस्य चंद्रकाम गोकल, बबन म्हात्रे, अविनाश म्हात्रे, शोभा भोईर, अंजली नाईक, राजेंद्र म्हात्रे, प्रतिक्षा म्हात्रे, रविना नाईक, माजी जि.प. सभापती संजय जांभळे, जिल्हाध्यक्ष राजाभाई केणी, सामाजिक कार्यकर्ते विजय म्हात्रे, यशवंत मोकल, एच. ए. म्हात्रे, प्रभाकर म्हात्रे, विनायक म्हात्रे, भाटकर म्हात्रे, पांडुरंग म्हात्रे. पी. ए. म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, जगदीश म्हात्रे उपस्थित होते.