Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️आर्णव कोळीची ६९ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड!♦️♦️भटिंडा येथे झालेल्या ऑल इंडिया शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये २७ गुणांची उत्कृष्ट कामगिरी

Responsive Ad Here
      ✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

      .रायगड जिल्ह्यातील सिद्धांत रायफल अँड पिस्तूल शूटिंग क्लबचा प्रतिभावान नेमबाज आर्णव कोळी याने नेमबाजी क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पंजाबमधील भटिंडा येथे २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान सुरू असलेल्या ३५ व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर शूटिंग चॅम्पियनशिपच्या शॉटगन स्पर्धेत त्याने महाराष्ट्र रायफल संघटनेचे प्रतिनिधित्व केले. ट्रॅप शॉटगन नेमबाजी प्रकारात २७ गुणांची उत्कृष्ट कामगिरी करत त्याने ६९ व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.
    विशेष म्हणजे, अवघ्या १५ दिवसांच्या अथक सराव आणि मेहनतीच्या जोरावर आर्णवने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
    आर्णवच्या या यशामागे सिद्धांत रायफल अँड पिस्तूल शूटिंग क्लबचे प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय ज्युरी राल्सटन कोयलो यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्लबचे अध्यक्ष विजय खारकर, सचिव व राष्ट्रीय नेमबाज रायगड भूषण किशन खारके, खजिनदार प्रितम पाटील, प्रशिक्षक अलंकार कोळी, महेश भाऊ फुलोरे, अजिंक्य चौधरी, समाधान घोपरकर, सूरज थळे, सागर भोईर, किरण माळी, राजू मुंबईकर यांच्यासह क्लबच्या सर्व सदस्यांनी आर्णवचे अभिनंदन केले.
   .अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर मजल मारणाऱ्या आर्णव कोळीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, आगामी ६९ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी त्याला क्लबच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.