✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
पेण तालुक्यासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. पेण येथील सुप्रसिद्ध समाजसेवक आणि गेली अनेक वर्षे सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व गिरीश तापिदास शहा यांची रायगड जिल्हा शांतता समिती सदस्यपदी निवड झाली आहे.
रायगडचे जिल्हाधिकारी किशन नारायणराव जावळे आणि पोलीस अधीक्षक सौ. आँचल दलाल यांच्या स्वाक्षरीने त्यांना अधिकृत नियुक्ती
पत्र प्रदान करण्यात आले आहे. या निवडीमुळे पेणच्या सामाजिक
क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.गिरीश शहा हे नाव पेणमध्ये नवीन नाही. रक्तदान शिबिर असो, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत किंवा गोरगरिबांना मदत प्रत्येक ठिकाणी ते अग्रेसर असतात. त्यांच्या याच अविरत सेवेची दखल घेऊन त्यांना आजपर्यंत ३५ हून अधिक सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी गुरुवार दि. २७/०८/२०२६ रोजी सकाळी १० वाजता, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आयोजित केली असून, या बैठकीस त्यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. या निवडीबद्दल पेण तालुक्यात सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.