Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️पेण नगरपरिषदेचा शिवप्रेमींच्या भावनांशी खेळ !♦️छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने अजब शिल्प उभारल्याने पेणकरांमध्ये तीव्र संताप

Responsive Ad Here
✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे

    पेण शहरातील चिंचपाडा रिंगरोड वरिल छत्रपती संभाजी महाराज चौकाचे  सुशोभीकरण करताना पेण नगरपरिषद प्रशासनाची बेफिक्री समोर आली आहे . महापुरुषांच्या नावाने चौक सुशोभीकरण करताना योग्य नियोजन तसेच ऐतिहासिक भान आणि स्पष्टआकृतीबंध ठेवणे गरजेचे होते परंतु नगर परिषदेन तेभान न ठेवल्याने समस्त पेन नगरवासीयांनी टीका केली .
   
    नगर परिषद मध्ये या चौकात धातूचेप्रतीकात्मक शिल्प उभारले आहे ज्यामध्ये वाघाशी लढा देणारीमानवी आकृती दर्शवली .मात्र छत्रपती संभाजी महाराजाच्या या शौर्याचे प्रतीक म्हणूनहे शिल्प उभारताना .स्पष्ट व आकर्षक महाराजांच्याव्यक्तिमत्त्वाला साजेसेअसावे याचा कसलाही विचार प्रशासनाने केलेला दिसत नाही .वाद पेटल्यानंतर नगरपालिकेने हे केवळ एक प्रतिकात्मक रूप असूनपूर्ण कृती पुतळ्याने प्रशासकीय मान्यता असणे गरजेचे आहेअसे स्पष्टीकरण दिले जात आहे .परंतु जर प्रशासकीयमान्यता नव्हती तर ,घाई घाईत अशापुतळ्याचे अस्पष्टिकरणउभारून शिव प्रेमिंच्या भावनांशी का खेळले गेले असा सवाल संतप्त पेनवासीय विचारत आहेत .आमदार निधीतून मिळालेल्या या सार्वजनिक पैशांचा वापर करून .लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषदअधिकाऱ्यांनी याशिल्पाच्या डिझाईनचीयोग्य पाहणी का केली नाही घाई गडबडीत लोकार्पन करून ... प्रसिद्धी मिळवण्याच्या नादातऐतिहासिक गांभीर्यबाजूला ठेवल्याचेया घटनेवरून स्पष्ट होत आहे .केवळ नावापुरते सुशोभीकरण करूनअथवाअस्पष्ट आकृत्या उभारूनमहापुरुषांचा अवमान करणेहे खपवून घेतले जाणार नाही .नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ या चुकीची दुरुस्ती करावीआणि प्रशासकीय मान्यता मिळवून  छत्रपती संभाजी महाराजांचे स्पष्ट व भव्य पुतळा चौकात उभारावा अशी तीव्र मागणी आता जोर धरत आहे .
   यागोष्टीचा पेण शहरातच नाहीतर गावागावातून निषेद दर्शविला जात आहे