.गडब / अवंतिका म्हात्रे
कोकणातील महायुतीमधील दोन प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा पेण तालका राष्ट्रष्टवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
यावेळी उपस्थित पदाधिकान्यांनी सांगितले, रामदास कदम यांनी केलेले वक्तव्य हे बेजबाबदार, आक्षेपार्ह आणि महायुतीच्या धर्माला तडा देणारे असल्याचे सांगितले. 77 महायुतीतील घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापणे अयोग्य असून, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या भावना दुखावलेल्या आहेत. बेताल वक्तव्य करून चर्चेत राहायचं अशी भूमिका कदम यांची आहे. खासदार सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेली टीका कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचे स्षष्ट केले.
तसेच भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत, पक्षश्रेष्ठींनी त्यांना एकदा समज द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकतें अधिक तीव्र भूमिका घेतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
पेण विधानस्मा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, तालुका अध्यक्ष दयानंद भगत, जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके,
जिल्हा सेवदेल अध्यक्ष गंगाधर पाटील, महिला शहर अध्यक्ष सुचिता चव्हाण, विधानस्मा सचिव प्रभाकर लांगी, तालुसिवव नरेंद्र म्हात्रे, सहसचिव प्रमोद म्हात्रे, महालमिया जिल्हा परिषर्द गण अध्यक्ष प्रभाकर निगवले, दादर पंचायत समिती गण अध्यक्ष नासिकेत मोकल, पाबळ पंचायत समिती गण अध्यक्ष वैभव भोईर, कासु विभाग अध्यक्ष प्रीतम केणी, ज्येष्ठ कार्यकर्ते मंगेश चव्हाण तसेच तालुका विद्यार्थी अध्यक्ष साजन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.