Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️♦️दिव्यांगांसाठी ऑनलाइन नोंदणीचे आवाहन - साईनाथ पवार

Responsive Ad Here

✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
नमहाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाने सुरू केलेल्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर सर्व दिव्यांगांनी आपला UDID कार्ड क्रमांक टाकून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे अर्ज घरबसल्या ऑनलाइन भरता येणार आहेत.

दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने हे पोर्टल सुरू करण्यात आले असून, दिव्यांगांसाठी विविध योजनांचे अर्ज करण्यासाठी एकच डिजिटल दालन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांसाठी नवीन योजना कार्यान्वित केल्या जात असून, या उपक्रमामुळे दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.

दिव्यांग बांधवांनी खालील लिंकवर जाऊन आपली नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी लिंक :
https://divyangsahayakportal.maharashtra.gov.in

अशी माहिती श्री साईनाथ द. पवार, अशासकीय सदस्य, महाराष्ट्र राज्य दिव्यांग सल्लागार मंडळ, दिव्यांग कल्याण मंत्रालय, मुंबई तसेच राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना यांनी दिली.