गडब/सुरेश म्हात्रे
🟦रायगड जिल्ह्यात सर्वात मोठे बेकायदेशीर भंगार विक्रेते आहेत, रायगड पोलिसांचे भंगार विक्रेत्यांना अर्थपूर्ण अभय आहे , रायगड जिल्ह्यात पोलिसांचा वचक राहिला नाही, भंगार चे बेकायदेशीर धंदे बंद करने हे रायगड पोलिसांचे काम आहे परंतु रायगड पोलिसांना हप्त्यापुढे काहीच दिसत नाही, रायगड पोलिसांनी ध्रुतराष्ट्रा ची भूमिका घेतली आहे,
रायगड पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे आणि कारवाई न करण्याच्या भूमिकेमुळे भंगार व्यवसायकांची गुंडगिरी वाढली.
रायगड जिल्ह्यात अनेक म्हणजेच शेकडो लहानमोठे भंगार विक्रेते आपला व्यवसाय करतात. त्यातही मोठया भंगार विक्रेत्यांनी बेकायदेशीररित्या आपला व्यवसाय थाटून परिसरात दहशत निर्माण केली आहे. कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना भंगार विक्रेते राजरोसपणे
व्यवसाय वाढवितात. त्यांच्या या कृत्यातून पोलिसांचा वचक नसल्याचे दिसत जरी असले तरी पोलिसांना आर्थिक सुगीचे दिवस आले आहेत.
जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून कारवाईचे आदेश द्यावेत, परंतु रायगड पोलीस लक्ष देतील असेल मला वाटत नाही.
रायगड जिल्ह्यात विविध भागात भंगार विक्रेत्यांनी आपले बस्तान बसविले आहे. रायगड जिल्ह्यातील भंगार व्यवसायिक यांनी स्थानिक महापालिका/नगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायत आणि पोलिसांशी हातमिळवणी करून खिश्यात ठेवले आहे. परिणामी भंगार विक्रेत्यांना कायदेशीर परवानगीची गरजच नसते.
रायगड जिल्ह्यात पेण येथे झबू JSW स्टील,
दादर येथे आश्रफ JSW स्टील,
कोलाड येथे रियाज,
नावेद व रईस Posco स्टील,
एमआयडीसी महाड येथे शकील,मुरा, रशीद,
माणगांव विळे भागड येथे राजू पोस्को,
वडखळ येथे JSW भंगार - राजू, चौधरी,बिरबल,मिश्रा, शफिक,
रोहा येथील मेनू हे सर्वात मोठे भंगार व्यावसायिक बेकायदेशीर रित्या व्यवसाय करतात. त्याचे अनुकरण इतरांनीही करण्यास सुरवात केली आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडतो. याप्रकरणी अशा बेकायदेशीर भंगार विक्रेत्यांना आळा घालावा अशी मागणी मा. राज्यपाल साहेब, मा. मुख्यमंत्री साहेब, मा. गृहमंत्री साहेब, मा. मुख्य सचिव साहेब, मा. पोलीस महासंचालक साहेब, मा. विभागीय आयुक्त साहेब कोकण भवन मा. पोलीस महानिरीक्षक साहेब कोकण भवन, मा. पोलीस अधीक्षक साहेब रायगड यांच्याकडे वरील बेकायदेशीर भंगार विक्रेत्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी ही नम्र विनंती आहे.