✍️गडब / सुरेश म्हात्रे
लोकप्रिय आमदार अनिकेत भाई तटकरे ह्यांच्या शिफारशी नुसार पेण तालुक्याच्या विकासासाठी चार कोटी रुपये महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार सुनील जी तटकरे साहेब महिला बाल विकास मंत्री माननीय नामदार आदिती तटकरे ह्यांच्या माध्यमातून पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागणी नुसार पेण तालुक्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध केला असून तालुक्यात वाशी विभाग, हमरापूर विभाग, पेण पूर्व विभाग जिते विभाग 44 ठिकाणी उदघाटन भूमिपूजन लोकांर्पण सोहळा पेण विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र ठाकूर व पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दयानंद भगत ह्यांचे हस्ते संपन्न करण्यात आले .
यावेळी कुरनाड अंतर्गत रस्ता, वाशी संरक्षण भिंत, सरेभाग अंतर्गत रस्ता, ओढगी अंतर्गत रस्ता, घोडाबंदर अंतर्गत रस्ता, मोठे वढाव येथे साकावं, वढाव लक्ष्मण महाराज साधन स्तभ रस्ता, मोठे भाल अंतर्गत रस्ता, विठ्ठल वाडी येथे अंतर्गत रस्ता, ठाकूरबेडी अंतर्गत रस्ता, बेणेघाट अंतर्गत रस्ता, बोरी येथे समाज मंदिर सुशोभीकरण, दिव स्मशान भूमी दुरुस्ती, जोहे अंतर्गत रस्ता, कोपर अंतर्गत रस्ता, हमरापूर सामाजिक सभागृह बांधणे, हमरापूर व्यायाम शाळा, सोनाखर अंतर्गत रस्ता, कळवे अंतर्गत रस्ता, दादर अंतर्गत रस्ता, वरेडी अंतर्गत रस्ता, पाटनोली नवघर अंतर्गत रस्ता, गागोदे बुद्रुक गणपती विसर्जन घाट, गागोदे खुर्द सामाजिक सभागृह, जिते अंतर्गत रस्ता, वलक येथे स्मशानभूमी शुशोभीकरण, बलवली येथे नाल्यावर साकव टाकणे, खारपाडा घोटमालवाडी अंतर्गत रस्ता तयार करणे, खरोशी येथे अंतर्गत रस्ता तयार करणे, खरोशी येथे शेतकऱ्यांसाठी जाण्यासाठी साकव तयार करणे, आंबिवली येथे अंतर्गत रस्ता, मुंगोशी अंतर्गत रस्ता तयार करणे, धावटे येथे अंतर्गत रस्ता, बलवली फणस वाडी अंतर्गत रस्ता, आंबेगाव गणपती वाडी विसर्जन घाट तयार करणे, ठाकूरपाडा स्वयंभू मंदिरापर्यंत रस्ता, दूरसेत येथे अंतर्गत रस्ता, हेटवणे अंतर्गत रस्ता, मलेगाव येथे भवानी मंदिर शेड बांधणे, रोडे अंतर्गत रस्ता, हनुमान पाडा येथे व्यायामशाळा भूमिपूजन, उंबर्डे अंतर्गत रस्ता, धोंडपाडा अंतर्गत रस्ता, रायगड जिल्हा परिषद शाळा वरेडी शौचालय भूमिपूजन, बहिरम कोटक अंतर्गत रस्ता, अशा अनेक विकास कामांची उदघाटन भूमिपूजन लोकांर्पण कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी ह्यांच्या उपस्थितत संपन्न झाले .
.गेल्या तीन दिवसात गाव तेथे विकास नारा देत तालुक्यात विकास गंगा पोहचवण्यात आले आहे यावेळी विविध उदघाटन प्रसंगीं जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके जिल्हा सरचीटणीस गंगाधर पाटील जिल्हा चिटणीस आत्माराम म्हात्रे जिल्हा ओबीसी सेल उपाध्यक्ष यशवंत घासे पेण युवक अध्यक्ष विकास पाटील महिला अध्यक्ष चैताली पाटील तालुका उपाध्यक्ष अवंतिका म्हात्रे महिला उपाध्यक्ष जयश्री पाटील पेण विधानसभा सचिव प्रभाकर लांगी तालुका उपाध्यक्ष महेंद्र वर्तक विध्यार्थी तालुका अध्यक्ष साजन पाटील ओबीसी सेल तालुका अध्यक्ष भगवान पाटील अपंग सेल तालुका अध्यक्ष गणेश पाटील कृषि सेल अध्यक्ष अजित ठाकूर वडखळ जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र वर्तक पेण युवक उपाध्यक्ष सुमित म्हात्रे वढाव पंचायत समिती अध्यक्ष श्रीकांत पाटील दादर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप म्हात्रे रावे पंचायत समिती अध्यक्ष नशिकेत मोकळ तालुका उपाध्यक्ष भरत महाडिक जिते जिल्हा परिषद अध्यक्ष सुदर्शन पाटील तालुका सचिव अशोक डंगर तालुका चिटणीस प्रभाकर लांगी मच्छिमार सेल अध्यक्ष बिपीन पाटील युवक उपाध्यक्ष आदित्य पाटील जिते पंचायत समिती अध्यक्ष धर्मेंद्र म्हात्रे शिक्षक सेल अध्यक्ष नथुराम म्हात्रे पदाधिकारी उपस्थित होते
एक महिन्यापूर्वी लोकप्रिय आमदार मा अनिकेत भाई तटकरे ह्यांचे हस्ते झोतीरपाडा जिल्हा परिषद मतदारसंघ आमटेम, देवळी, खारपाले, कासु, कुहिरे, काराव - गडब, गंगावणे, अशा अनेक गावात जाऊन विकास कामांची उदघाटन संपन्न झाले .