Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

♦️गडब ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या गाळ्यामध्ये गावठी दारू विक्री.,आता बोला!♦️

Responsive Ad Here
 गडब/सुरेश म्हात्रे

पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या गडब ग्रुप ग्रामपंचायतिच्या हद्दीत गावठी दारू विक्री होत असल्याची चर्चा संपूर्ण गडब गावात केली जात आहे. 
   गडब ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत संपूर्ण पंचकृषी नाक्यानाक्यावर या गावठी दारू विक्रीची चर्चा रंगत आहे.सदर दारूविक्रेता गडब ग्रामपंचयतीचा सदस्याचा नातेवाईक असल्याचे बॉले जात आहे.यासंदर्भात गडब येथील पत्रकार सुरेश म्हात्रे यांनी ग्रामपंचायतीच्या जबाबदार व्यक्तीस याची कल्पना दिली होती मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.
पेण तालुक्यातील गडब गावात दारू विक्रीचे सात ते आठ दारूचे धंदे सुरू आहेत ,याबाबत वडखळ पोलिसांना माहिती असून कोणतीही कारवाई करत नाहीत.वडखळ पोलीस ठाण्याचे बीट हवालदार धुपकर यांना सदर दरुविक्रीची कल्पना दिली आहे सदर दारूविक्री बाबत दारू कोणत्या ठिकाणी लपवतात याची कल्पना पत्रकार यांनी दिली आहे मात्र कोणत्याही प्रकारे कारवाई होत नाही.सदर दारू विक्री बंद करावी अशी मागणी पेण तालुक्यासह संपूर्ण गडब वाशिय व्यक्त करीत आहेत.