Join Us

साप्ताहिक रायगडची शान चे अधिकृत न्यूज पोर्टल. . . मुख्य संपादक . . . श्रीसुरेश म्हात्रे mob - 9270456814 . . . कार्यकारी उपसंपादक . . . . सौ अवंतिका म्हात्रे mob - 7821917164

⭕जेएसडब्ल्यू कंपनीत स्थानिक कामगारांना प्राधान्य देणार--सरचिटणीस आत्माराम म्हात्रे⭕

Responsive Ad Here
गडब/सुरेश म्हात्रे

पेण तालुक्यातील उत्पन्नात अग्रेसर असणाऱ्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीत स्थानिक तरुणांना कोणत्याही प्रकारे नोकरीत सामावून घेतले जात नाही. त्या विरोधात जेएसडब्ल्यू प्रशासना विरोधात रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आत्माराम मात्रे यांनी कंपनीच्या या धोरणाविरुद्ध आंदोलन छेडणार असल्याचे पत्रकार शी बोलताना व्यक्त केले.
जेएसडब्ल्यू कंपनीत मोठ्या प्रमाणात स्थानिक उमेदवारांना डावले जात आहे. आज कंपनीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांची भरती केली जात आहे. युपी बिहार राजस्थान बंगाली आदी उमेदवारांना प्राधान्य दिले जात आहे. कंपनीत उमेदवारांची भरती करताना स्थानिक उमेदवारांना डावले जात आहे. या विरोधात राष्ट्रवादीच्या माध्यमातून मोठे जन आंदोलन उभारले जाणार आहे.
कंपनीत अडाणी भैय्यांना प्रशासन झुकते माप दिले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे सरचिटणीस आत्माराम म्हात्रे यांनी कंपनींला मोठा अल्टरमॅट दिला आहे.