.✍🏻गडब / अवंतिका म्हात्रे
आजग्रुप ग्रामपंचायत चरही खुर्द तालुका तळा जिल्हा रायगड येथे लोकनेते आदरणीय स्वर्गीयवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेसपुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
आज अजित दादा आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, कार्य आणि सर्वसामान्य जनतेप्रती असलेली त्यांची तळमळ प्रत्येकाच्या मनात आजही जिवंत आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना मन नकळत भरून येते. त्यांनी दाखवलेला जनसेवेचा मार्ग, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीची शिकवण आम्हाला सदैव प्रेरणा देत राहील.
दादांचे शब्द आजही प्रत्येकाला प्रेरणा देतात…
“जोपर्यंत माझे हात-पाय हालचाल करत आहेत, तोपर्यंत तुमचं भलच करीन मी काम करणारा, सर्वसामान्य माणसासाठी झटणारा माणूस आहे.”मी कामाचाच माणूस आहे
हे शब्द आजही कानात घुमतात आणि जनतेसाठी अखंड झटणाऱ्या त्या नेतृत्वाची कायम आठवण करून देतात.
....लोकनेते, आदरणीय स्व. अजितदादा आशाताई अनंतराव पवार साहेब यांना जयंतीनिमित्त प्रतिमेस पुवपदार अर्पन करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
सदर कार्यक्रमास श्री. प्रविण चंद्रकांत आंबार्ले सरपंच ,
श्री. अजय अनंत सावंत उपसरपंच ,
सरपंच उपसरपंच यांनी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण केला व
सौ. रश्मी राजेंद्र आंबार्ले सदस्या
श्रीम. जयश्री तुकाराम सकपाळ सदस्या
अंगणवाडी सेविका मदतनीस शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते .